आमदार किर्तीकुमार भांगडीया व माजी आमदार मितेश भांगडीया यांच्या फॉडेशन ग्रुप व भारतीय जनता पार्टी यांच्या कडून किट वाटप.
Bhairav Diwase. May 07, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- सावली जवळ असलेल्या पारडी येथील मोठ्या प्रमाणात मजूर तेलंगणा येथे मिरची तोडण्यासाठी गेले होते.कोरोना विषाणू च्या संसर्गामुळे संपूर्ण भारतात लॉकडाऊन केले गेल्याने सदर मजूर तेलंगणात लटकले होते.दि.३ मे ला गावात येताच त्यांना नवीन ग्रा.पं. भवन,जि. प.शाळा व हरणघाट उपसा सिंचन योजनेच्या कॉटर वर विलगिकरन करण्यात आले.त्या मजुरांना स्वयंपाक करण्यासाठी धान्य व किराणा सामान नसल्याने सौ छायाताई शेंडे माजी सभापती तथा सदस्य पं. स.सावली यांच्या पुढाकारातून आमदार किर्तीकुमार भांगडीया व माजी आमदार मितेश भांगडीया यांच्या फॉडेशन ग्रुप व भारतीय जनता पार्टी यांच्या कडून धान्य व किराणा सामानाचे किट सौ.छायाताई शेंडे माजी सभापती तथा सदस्य पं स.सावली तसेच श्री तुकाराम पोरटे सरपंच यांच्या हस्ते मजुरांना वाटप करण्यात आले.