Top News

सोशल फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम वाटसरूंना केली भोजनाची व्यवस्था.

मजूर वर्गाला मदतीचा एक हात.
Bhairav Diwase.   May 01, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली: कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारतात लॉकडाऊन लागू केल्याने प्रवासी वाहने सुद्धा बंद करण्यात आले. त्यामुळे इतर राज्यात अडकून असलेल्या कामगार वर्गाला आपल्या स्वगावी परत जाण्याचे साधन नसल्याने पायदळ मार्गक्रमण करीत आहेत. अशा मजूर वर्गाला मदतीचा एक हात म्हणून सावली येथील सोशल फाउंडेशनच्या वतीने पायदळ मार्गक्रमण करणाऱ्या वाटसरूंना भोजनाची व्यवस्था करण्यात येत आहेत.
 सध्या भारतात कोरोना विषाने थैमान घातले आहे. याचा प्रतिबंध करण्यासाठी टाळेबंदी व संचार बंदी जाहीर करण्यात आली. संपूर्ण राज्यात कामे बंद करण्यात आले. त्यामुळे कामगारांना  काम मिळणे कठीण झाले. हाताला काम नसल्याने व जवळील राशन संपल्याने कामगारांना जगावे की मरावे? असा प्रश्न उपस्थित झाला. या कारणाने इतर राज्यात कामासाठी गेलेले मजूर पायदळ मार्गक्रमण करून पाचशे ते हजार किमीचे अंतर पार करून आपल्या स्वगावी जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. पायदळ मार्गक्रमण करीत असलेला कामगार वर्ग उपाशी राहू नये,  या उदात्त हेतूने सावली येथील सोशल फाउंडेशनने त्यांच्या भोजनाची व्यवस्था करून सामाजिक कर्तव्य जोपासत आहे. भोजनदानाचे  कार्य प्रवासी साधन सुरू होईपर्यंत निरंतर सुरू राहील अशी माहिती सदस्यांनी आमच्या प्रतिनिधीला दिली. या कार्यामुळे सोशल फाउंडेशनचा सर्वत्र कौतुक केल्या जात आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने