आम. मुनगंटीवार यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना शिष्ठमंडळाने मांडल्या नागरिकांच्या व्यथा.
Bhairav Diwase. May 09, 2020
चंद्रपुर:- जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप मोठा नसला तरी, परप्रांतातून व दुसऱ्या जिल्ह्यातून येणाऱ्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे,येणाऱ्याचें स्वागत असून या सर्वांची तपासणी करावी व आवश्यक ते पाऊल नासगरिकांच्या हितासत्व उचलण्यात यावे,यासाठी असवश्यक ती मदत आम्ही करू,अश्या सूचना माजी पालकमंत्री आम.सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमणध्वनी द्वारे केल्यानंतर आज ९ मे पासूनच शकुंतला लॉन येथे बाहेरून येणाऱ्याची तपासणी करण्याचा निर्णय जिल्हाप्रशासनाने घेतला आहे.या संदर्भात नुकतीच एक बैठक भाजप च्या शिष्ठमंडळा सोबत जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली.आणि महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
या वेळी जिल्हाधिकारी डॉ कुणाल खेमणार, नोडल अधिकारी कर्डीले यांचे सोबत उपमहापौर राहुल पावडे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष ब्रिजभूषण पाझारे,स्वीय सचिव दत्तप्रसंन्न महादानी, डॉ मंगेश गुलवाडे यांनी चर्चा केली.
यावेळी राहुल पावडे यांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा निरोप जिल्हाधिकाऱ्यांना देत, नागरिकांच्या समस्या मांडल्या.या मध्ये येण्याजाण्याचे पास,येणाऱ्या नागरिकांची तपासणी, नागरिकांनी स्वतः तपासणी करून घेणे आदि विषयावर चर्चा झाली.
जिल्हाधिकाऱ्यानी सकारात्मक धोरण अंमलात घेऊन शकुंतला लॉन येथे त्वरित तपासणी केंद्र सुरू करण्याचे आदेश दिले. येणाऱ्या नागरिकांना घरीच १४ दिवस कोरोंटाइन राहावे लागेल व आवश्यकता वाटल्यास गरज असेल त्याला इन्स्टिट्युशनल कोरोंटाइन करण्याचे निर्देश दिले.येण्या जाण्याचा पासेस बाबत सुसूत्रता आणून प्रक्रिया सोपी करून, जिल्हाधिकारी कार्यालय मार्फतच हे कार्य सुरू ठेवण्याचे जाहीर केले.
आम.मुनगंटीवार यांनी पुण्यातील विदयार्थ्यांना चंद्रपुरात आणण्याचा संकल्प केला आहे.या विद्यार्थ्याना पण याच प्रक्रियेतून जायचे असून तालुकास्थानी पण सर्वांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे.