आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांचे फलित शासनाने केला आदेश निर्गमित.
Bhairav Diwase. May 09, 2020
चंद्रपूर:- कोरोना विषाणुच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर पुण्यात चंद्रपूर जिल्ह्यात अनेक विद्यार्थी, नोकरदार व नागरिक मोठ्या संख्येने अडकले आहे. माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी 3270 नागरिकांचा डेटा गोळा करुन शासनाला पाठविता असुन एस.टी. बसेसच्या माध्यमातुन निःशुल्क प्रवासाची सोय उपलब्ध करण्याची मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब, परिवहन विभागाच्या सचिवांकडे केली. सदर मागणीची पुर्तता झाली असुन शासनाने याबाबतचा आदेश निर्गमीत केला आहे.
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने पुण्यात अडकलेल्या 3270 नागरिकांचा चंद्रपूर जिल्ह्यात परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बसेसचे सॅनिटायझेशन उत्तमरित्या करण्यात यावे, प्रवासी नागरिकांना मास्क देण्यात यावे, योग्य प्रकारे त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात यावी, चंद्रपूर येथे आल्यानंतर आवश्यकता असल्यास संबंधीत नागरिकांना संस्थात्मक कोरंटाईन व होम कोरंटाईन करण्यात यावे अशा सुचना सुध्दा आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या आहेत.