पोलिसात तक्रार:- सरकारी स्वस्त धान्य, असल्यावरून तिघांवर गुन्हा दाखल.
Bhairav Diwase May 06, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अमित उइके, गोंडपिपरीगोंडपिपरी:- स्थानिक पंचशील वॉर्डातून तांदूळ साठा भरून चंद्रपूर मार्गावर जात असलेले टाटा एस हे वाहन गांधी चौक परिसरात पकडण्यात आले. येथील नगर पंचायत चे नगरसेवक जितेंद्र अष्टेकर तसेच इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी यांनी अन्नपुरवठा अधिकाऱ्यांना केलेल्या तक्रारीनुसार मोका पंचनामा करून याबाबतची पोलिसात तक्रार देण्यात आली. प्राप्त तक्रारीनुसार पोलिसांनी तिघा जणांवर गुन्हा नोंद केला असून सदर घटना ही काल दुपारी साडेअकराच्या सुमारास घडली.
काल दि.4 मे रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास पंचशील वार्डातील पत्रकार राजू झाडे यांचे घरून टाटा एस वाहन क्रमांक एम एच 34 ए बी 9597 हे वाहन तांदूळ साठा भरून गांधी चौक येथे थांबले असता संबंधित प्रभागाचे नगरसेवक तांदूळ साठा संशयास्पद वाहतूक करीत असल्याबाबतची शंका उपस्थित करीत अन्नपुरवठा निरीक्षक संघपाल मेश्राम यांना पाचारण केले. सदर घटनेची माहिती मिळताच पुरवठा निरीक्षक संगपाल मेश्राम यांनी ताबडतोब घटनास्थळ गाठून वाहनाची तपासणी केली असता प्लास्टिक थैली मध्ये प्रत्येकी 25 किलो अशा 53 तांदूळ भरून असलेल्या पिशव्या अंदाजे 13 क्विंटल मुद्देमाल असल्याचे निदर्शनास आले. या वेळेस पंच म्हणून गोंडपिंपरी येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश डहाळे नगरसेवक राकेश पून , कुणाल गायकवाड, सुनील संकुल वार , प्रमोद तुम डे प्रामुख्याने उपस्थित होते. वाहनात भरलेल्या तांदूळ साठा बहुतांश प्रमाणात रेशन दुकानाचा मा ल असल्यावरून पुरवठा निरीक्षक मेश्राम यांनी वाहन चालक विवेक जेंगठे पत्रकार राजू झाडे व पत्रकार समीर निमगडे यांचे पंचा समक्ष पंचनामा करून बयान नोंदविले. याप्रसंगी राजू झाडे यांनी सदर मालं हा टाळेबंदी च्या पार्श्वभूमीवर उपासमारीचे संकट उडवलेल्या गोरगरीब गरजू व्यक्तींसाठी सामूहिक रीत्या गोळा करण्यात आलेला असून याचे गरजुन मध्ये वाटप करण्यासाठी नेत असल्याचे सांगितले. तर पत्रकार समीर निमगडे यांनी पाण्याची टाकी नेण्याकरिता वाहन भाड्याने घेतल्याचे बयानात सांगितले.मात्र पुरवठा निरीक्षक यांनी गोंडपिपरी पोलीस स्टेशन येथे लेखी तक्रार देऊन तांदूळ साठा भरलेली वाहन पोलिसांच्या ताब्यात दिले. पुरवठा विभागाच्या प्राप्त तक्रारीनुसार गोंडपिपरी पोलिसांनी अंदाजे किंमत 3,50,000 इतका मुद्देमाल ताब्यात घेऊन अपराध क्रमांक 99/२० जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार अधिनियम ( 3 ),(7) अन्वये आरोपी वाहन चालक विवेक जेंगठे, राजू झाडे, समीर निमगडे यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. एकंदरीत या प्रकरणात जप्त करण्यात आलेला तांदूळ साठा नेमका आला कुठून? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात असून, सदर प्रकरणात नगरसेवक विरुद्ध पत्रकार असा संघर्ष पेटल्याने या प्रकरणाची शहरात उलट सुलट चर्चा सुरू आहे.
गोंडपिपरी येथील पंचशील वॉर्डातून तांदूळ साठा भरून वाहत जात असल्या बाबतची फोन द्वारे तक्रार गणेश डहाळे यांनी केली. प्राप्त तक्रारीवरून घटनास्थळी मोका पंचनामा तून प्राप्त माहितीनुसार याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
संघपल मेश्राम
अन्न पुरवठा निरीक्षक गोंडपिपरी.