Click Here...👇👇👇

विविध जिल्‍हयांमध्‍ये अडकलेले विद्यार्थी, मजूर आदींना स्‍वगृही आणण्‍यासाठी निःशुल्‍क एस.टी. बस प्रवास उपलब्‍ध करावा – आ. सुधीर मुनगंटीवार

Bhairav Diwase
सकारात्‍मक कार्यवाहीचे परिवहन मंत्री व सचिवांचे आश्‍वासन.
 Bhairav Diwase.    May 05, 2020
 
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी)वैभव एनपल्लीवार, चंद्रपर
चंद्रपूर: महाराष्‍ट्रात अनेक जिल्‍हयात अडकेलेले विद्यार्थी, मजूर यांच्‍या संदर्भात सुध्‍दा आपण एस.टी. महामंडळाच्‍या माध्‍यमातुन राज्‍यात निर्णय घेण्‍याची आवश्‍यकता आहे. 85 टक्‍के भार हा राज्‍य सरकारने खर्च करावा आणि 15 टक्‍के भार हा जिल्‍हा नियोजन  समितीच्‍या माध्‍यमातुन करावा व या सर्वांना मोफत प्रवास देत स्‍वगृही पोहचवावे, अशी मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी राज्‍य शासनाला केली आहे. यासंदर्भात आ. मुनगंटीवार यांनी परिवहन मंत्री अनिल परब व परिवहन विभागाचे सचिव आशिषकुमार सिंह यांच्‍याशी दूरध्‍वनीद्वारे चर्चा केली असून यासंदर्भात सकारात्‍मक कार्यवाहीचे आश्‍वासन परिवहन मंत्री व सचिवांनी दिले आहे.
 
परराज्‍यातील मजूर व कामगारांना लॉकडाऊन शिथील झाल्‍यानंतर रेल्‍वेने त्‍यांच्‍या घरी पाठविण्‍यासाठी केंद्र सरकारने 85 टक्‍के केंद्राचा वाटा आणि 15 टक्‍के राज्‍य सरकारचा वाटा व मजूरांना मोफत असा निर्णय घेतला आहे. याचधर्तीवर राज्‍यात अनेक जिल्‍हयात अडकेलेले विद्यार्थी, मजूर यांना स्‍वगृही पाठविण्‍यासाठी एस.टी. बसेसच्‍या माध्‍यमातुन निःशुल्‍क प्रवासाची सोय उपलब्‍ध करून द्यावी, अशी मागणी  आ. मुनगंटीवार यांनी केली आहे. हे करताना प्रवाश्‍यांच्‍या आरोग्‍याची काळजी घेणे, बसेसचे सॅनिटायझेशन करणे व आरोग्‍याशी संबंधित सर्व खबरदारी घ्‍यावी असेही त्‍यांनी सुचविले आहे. केंद्र सरकारने राज्‍य सरकारला आपत्‍ती व्‍यवस्‍थापनासाठी जो निधी दिला आहे त्‍यातुन सॅनिटायझेशन व आरोग्‍याशी संबंधित उपाययोजना कराव्‍या, विशेषतः बसेसमधून प्रवास करणा-या विद्यार्थी, मजूर आदींना मास्‍क पुरविण्‍यात यावे असेही त्‍यांनी म्‍हटले आहे.
 
पुण्‍यात चंद्रपूर जिल्‍हयातील अनेक विद्यार्थी अडकलेले आहे ही संख्‍या लक्षणीय आहे. हे विद्यार्थी चंद्रपूरला परत येण्‍याच्‍या दृष्‍टीने पुणे-चंद्रपूर अशी विशेष बससेवा सुरू करावी अशी मागणी सुध्‍दा त्‍यांनी शासनाला केली आहे.