चंद्रपूर जिल्ह्याचा "ऑरेंज झोन'मध्ये समावेश.
Bhairav Diwase. May 05, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी)वैभव एनपल्लीवार, चंद्रपर
चंद्रपूर: चंद्रपूरकरांसाठी सकाळी सकाळी एक दिलासादायक बातमी आली आहे. दोन मे रोजी जो रुग्ण पोझिटिव्ह आढळला होता, त्याच्या पत्नी आणि मुलीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. तर मुलाचा रिपोर्ट अजून यायचा आहे. सवा महिन्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा पोझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर प्रशासनाने त्याच्या कुटुंबीयांना क्वारंटाईन केले होते. आता त्यातील दोघांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
देशात कोरोना विषाणूने चांगलाच थैमान घातला आहे. दिवसेंदिवस वाढत असलेली रुग्णांची संख्या चिंतेचा विषय ठरली आहे. एकट्या विदर्भाचा विचार केला तर नागपूर आघाडीवर असल्याचे दिसून येते.
येथेच मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आले आहेत. यानंतर यवतमाळ आणि अमरावतीचा नंबर लागलो. उर्वरित जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा शिरकाव व्हायचा होता. मात्र, भंडारा पाठोपाठ चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना विषाणूचा रुग्ण आढळून आल्याने आणखी एका जिल्ह्याचा कोरोनाच्या यादीत समावेश झाला होता.
शानिवारी सायंकाळी 8:30 वाजता चंद्रपूर जिल्ह्यात एका रुग्णाचा नमुना पॉझिटिव्ह आढळून आला होता. यामुळे चंद्रपूर महानगरातील बंगाली कॅम्प परिसरात असणाऱ्या क्रिष्णानगर भागाला पूर्णतः बंद करण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्ह्याचा "ऑरेंज झोन'मध्ये समावेश करण्यात आला होता. यामुळे प्रशासनाची चिंता चांगलीच वाढली आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड यांनी सायंकाळी साडेआठ वाजता 50 वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने हा परिसर सील केला आहे. परिसरात या आजाराचा फैलाव होऊ नये यासाठी रात्रीच कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. मात्र, रुग्णाच्या संपर्कातील दोघांचे नमुने निगेटिव्ह आल्याने थोडी चिंता कमी झाली आहे. मात्र, एकाचा मुलाचा अहवाल अद्याप यायचा आहे.