चक्क वर्ग खोलीतच ठेवली धान्याचे पोते!

Bhairav Diwase
सावली तालुक्यातील उमरी येथील जि प शाळेतील प्रकार. 
Bhairav Diwase.   May 30, 2020
   
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- सावली तालुक्यातील उमरी येथील जि प प्राथ शाळेमधील वर्गखोलीमध्ये धान्याचे पोते व समारंभासाठी लागणारे साहित्य साठवून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. शाळा हे विद्येच मंदिर आहे पण काही गांवपुढारी स्वतची मालमत्ता असल्यासारखे साहित्य ठेवन्यास मागेपुढे पाहत नाही.         या वर्षी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सरकारने अनेक निर्णय घेतले.मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या वर्षी शाळा मार्च महिन्यातच भरविणे बंद केले. आणि बाहेरील येणाऱ्या मजुरांना १४ दिवस विलगिकरण करून शाळेमध्ये ठेवण्यात आले. जेनेकरुण कोरोनाची लक्षणे माहिती पडतील व इतरांना याचा प्रादुर्भाव होणार नाही. पण काही गांवपुढारी स्वतच्या फायद्यासाठी शासकीय मलमत्तेचा वापर जणु आपल्या मालकीचे आहे हे समजून वापरित असतात. या शाळेमध्ये धान्याची पोती व इतर साहित्य कुणाचे?आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षाच्या माहिती नसेल का? हा प्रश्न निर्माण होत आहे. या सर्व बाबीची चौकशी करून संबंधितावर कायदेशीर कारवाही करण्यात यावी अशी मागणी परिसरात केली जात आहे.