कृष्णरूपी जनतेच्या दरबारात भाजपायुमोचे सुदामा.

Bhairav Diwase

सुदामा किट ठरत आहे वरदान.

आम.सुधीरभाऊ मुनगंटीवार विचार मंचचा उपक्रम

भा.ज.पा.यु.मो चे  टीमवर्क
Bhairav Diwase.    May 08, 2020

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी)वैभव एनपल्लीवार, चंद्रपर

चंद्रपूर:- कोरोना वैश्विक महामारीच्या संकटाने अनेकांची कम्बर मोडली आहे. यातच हातावर कमवून खाणारयांची दैना अवस्था झाली आहे. अश्यात आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार विचार मंचने गरजू-गरीब जनतेला सुदामा किटच्या माध्यमातून मदतीचा हात दिल्याने ही किट वरदान ठरत आहे. प्रत्येक गरजू पर्यंत पोहोचण्याची जवाबदारी भा.ज.पा.यु.मो चे जिल्हाध्यक्ष व जि प सदस्य ब्रिजभूषण पाझारे यांचे नेतृत्वात भा ज पा यु मो ने स्वीकारल्याने युवाशक्तीच्या टीमवर्क म्हणजे कृष्णस्वरूपी जनतेच्या दरबारात भाजयुमो चे सुदामा अशी चर्चा आता होऊ लागली आहे.

किमान दीड महिन्यांपूर्वी कोरोना महामारीने जगाला आपल्या कवेत  घेतले. भारत ही यातून सुटला नाही. २२ मार्च पासून सगळे घरात बंदिस्त झाले.सगळे व्यवहार ठप्प झाले.एकीकडे हाती पैसा नाही, खायला अन्न नाही,अशी अवस्था तर दुसरी कडे संसर्ग होण्याची भिती.यावर मात करण्यासाठी अनेक संघटना पुढे आल्या व मदतीचा हात दिला, पण लोकनेते आम सुधीर मुनगंटीवार यांनी सर्वस्तरावर मदतकार्य करण्याचा संकल्प केला. सर्व प्रथम त्यांनी, संसर्ग टाळण्यासाठी स्यानिटायझर वितरण केले, दोन वेळचे डब्बे घरपोच देण्याची व्यवस्था उभी केली, श्रीराम प्रसाद धान्य किट आदी उपक्रम सुरू असताना डॉक्टर्स ला पीपीइ किट, रक्तदान उपक्रम मोठ्या प्रमाणात जिल्हास्तरावर सुरू करण्यात आले. आम मुनगंटीवार यांच्या मागेल त्याला मदत देण्याच्या या धोरणामुळे लोकप्रतिनिधी आणि जनतेचे नाते पुन्हा दृढ झाले,हाच विचार पुढे नेण्याचा संकल्प आम सुधीरभाऊ मुनगंटीवार विचार मंच ने केला.भाजयुमो जिल्हाध्यक्ष व जीप सदस्य ब्रिजभूषण पझारे यांचे नेतृत्वात सुदामा किट जन्माला आली.मागेल  त्याला ही किट घरपोच देण्याचा उपक्रम सुरू झाला. चंद्रपुर विधानसभा क्षेत्रातील नकोडा, वढा, पांढरकवडा, उसगावसह महानगरात मोठ्या प्रमाणात ही किट वितरित करण्यात येत आहे. कुणीच उपाशी राहणार नाही, आपली जवाबदारी-आमचे कार्य हे ब्रीदवाक्य या उपक्रमासाठी देण्यात आले. ब्रिजभूषण पाझरे यांच्या नेतृत्वातील हा उपक्रम राजकीय वर्तुळात पण चर्चेचा ठरत आहे.शेवटच्या माणसांपर्यंत भाजयुमो पोहोचत असल्याने हजारो कुटुंबाला दिलासा मिळाला आहे.कोरोनाचा संसर्ग कुणालाही होऊ शकतो, न दिसणाऱ्या या शत्रूशी घरात बसून लढा द्यायचा आहे, तरीपण सोशल डिस्टन्स चे भान ठेवून संकटकाळी, लोकनेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात सगळ्या युवाशक्ती (भाजपायुमो) ने मदतकार्यात स्वतःला झोकून दिले आहे. लोकप्रतिनधी जनतेलाच देव मानतात,त्यामुळे भाजयुमो चे सुदामा कृष्णरूपी जनतेच्या दरबारी हजेरी लावत आहेत,असे म्हंटले तर वावगे ठरु नये. कदाचित यासाठीच तर आम सुधीरभाऊ मुनगंटीवार विचार मंचने या धान्य किट चे नामकरण सुदामा किट म्हणून तर केले नसेल ना? यावर आता चर्चा सुरू आहे.