🔴ग्रामीण दुकानदारांकडून मिठाचे दुपटीने भाव.
🔴 संबधित विभागणी लक्ष देण्याची गरज.
Bhairav Diwase. May 15, 2020
पोंभुर्णा:- छत्तीसगड मध्ये मिठाची काळाबाजारी झाली, आणि तिथून कोरची, आरमोरी भागात मिठाची टंचाई होणार असल्यांची वार्ता पसरली, ही वार्ता, अफवा असल्यांचे गडचिरोली जिल्हाधिकारी यांनी जाहीर केले तरी, अफवांचा बाजार चंद्रपूर जिल्हयातील मुल, पोंभुर्णा, सावली, गोंडपिपरी, आदी तालुक्यातील गावा गावात पोहचली. ग्रामीण दुकानदारांकडून दहा रुपयाला मिळणारे मिठाचे पुढे वीस रुपयाला विकल्या जात असल्याचे वृत्त आहे. जीवनावश्यक वस्तूवर अश्या अफवा पसरवून ज्यादा भावाने विक्री करून ग्रामीण जनतेची लूट होत असल्याने प्रशासनाने तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे.
चेक आष्टा, आष्टा, सोनापुर, चेक बल्लारपूर, नविन गंगापुर, कसरगठा, रामपुर दिक्षित, चिंतलधाबा, घनोटी तुकुम, सुशी दाबगावं, चिरोली, केळझर, जानाळा, जामखुर्द, जाम तुकुम, देवाडा खुर्द, आणि सर्व परिसरातील गावांमध्ये कोरोना संकटकाळा ने मिठाचा तुटवडा निर्माण होत असल्याची मोठी अफवा पसरली आहे. त्यामुळे मिठाची मोठी मागणी वाढली असून दुकानदारांकडून दुपट भावाने विक्री केली जात आहे. यात ग्रामीण जनतेची आर्थिक लूट होत असून नागरिकच आप्तांना माहिती पसरवीत असल्याचे समजते, मात्र याचा लाभ केवळ दुकानदार वर्गाला होत असून अनेक नागरिक मिठाच्या साठवणूक करिता बोरीच विकत नेल्याचेही वृत्त आहे.
छत्तीसगडमध्ये मिठाचा काळाबाजार सुरू झाल्यांने, तेथे मिठाचे दर वाढले. या भागाला लागून असलेल्या कोरची, आरमोरीचे मिठाची मागणी वाढली, त्यामुळे मिठाची टंचाई निर्माण होणार असल्यांची चर्चा सुरू झाली आणि मिळेल त्या भावाने लोक मिठ खरेदी करू लागले. ही अफवा एवढी पसरली कि, गडचिरोली जिल्हाधिकारी दिपक सिंगला यांनी, ‘जिल्हयात मुबलक प्रमाणत मीठ साठा उपलब्ध आहे, मिठाचा तुटवडा असल्याबाबत कुणी अफवा पसरविल्यास, त्यांचेविरूध्द कारवाई करण्यात येईल’ असे जाहीर करीत, नागरीकांनी कोणत्याही परिस्थितीत मीठ खरेदीसाठी रांगा लावू नयेत, जास्तीचे पैसे देवून मीठ खरेदी करू नये, अफवांवर विश्वास ठेवल्यामुळे, संबधीत तालुक्यातील मीठ संपल्यांचे समोर आले आहे, असेही त्यांनी सांगीतले. दुकानदारांनी याबाबत काळजी घेवून ग्राहकांकडून जास्तीचे पैसे घेवून मीठ विक्री करू नये. याबाबत ग्राहकांना खरी माहिती द्यावी असे आवाहन गडचिरोली प्रशासनाने केले आहे.
चंद्रपूर जिल्हयातील मुल, पोंभूर्णा, सावली, गोंडपिपरी, आदी तालुक्यातील अनेक गावातील महिलांचे माहेर गडचिरोली आहे. माहेरवरून, मुलींना मीठाची खरेदी करण्याच्या सुचना मिळाल्यांने, काल या भागात मीठ टंचाईची अफवा पसरली आणि मिठाची विक्री अचानक वाढली असल्यांचे दिसून आले..
कोणत्याही अफवांना बळी पडू देऊ नये. असे आव्हान चंद्रपूर जिल्हा प्रशासन वारंवार करत आहे.