NIMA व ABVP चंद्रपूरच संयुक्त उपक्रम.
Bhairav Diwase. May 15, 2020
चंद्रपूर:- कोरोना महामारीच्या काळामध्ये पोलीस कर्मचारी हे एका योद्धप्रमाणे राष्ट्रसेवेचा व्रत घेऊन कार्य पार पाडत आहे. याच काळात महाराष्ट्र पोलीस कर्मचाऱ्यांना पण कोरोनाची लागण होत असल्याचे निदर्शनात येत आहे. त्याची रोगप्रतिकारशक्ती कमी पडत आहे. कोरोनाशी लढा देण्यासाठी व आरोग्य सुदृढ राहण्यासाठी याच गोष्टीचे भान ठेवून नॅशनल इंटेगरेटेड मेडिकल असोसिएशन व अखिल भारतीय विद्यार्थी परिषद चंद्रपूर महानगर तर्फे आयुष मंत्रालय भारत सरकार निर्देशित आयुर्वेदिक रोगप्रतिकारशक्ती वर्धक चूर्ण चे वितरण करण्यात आले.
स्थानिक वाहतूक पोलीस नियंत्रक व रामनगर पोलीस स्टेशन येथे या चूर्णचे वाटप करण्यात आले. यावेळी सर्व स्थानिक पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती. शहरातील वरिष्ठ मंडळी व ABVP पुर्व कार्यकर्ता श्री.रत्नाकरजी जैन, श्री.रवींद्रजी येणारकर यांनी या कार्याचे कौतुक केले. यावेळी NIMA चे राष्ट्रीय उपाध्यक्ष डाँ. राजू ताटेवार, ABVP जिल्हा संयोजक प्रविण गिलबिले, शहर अध्यक्ष डाँ लक्ष्मीनारायण सरबेरे, ABVP महानगरमंत्री शुभम निंबाळकर, तसेच NIMA पदाधिकारी डाँ सुधीर मत्ते,डाँ विजय भंडारी, डाँ अमित कोसुरकर, ABVP महाविद्यालय प्रमुख शैलेश दिंडेवार, सहप्रमुख रोहित खेडेकर, ऋषिकेश बनकर, शीतल बिल्लोरे, रोहिणी ठाकरे, नंदिनी सोनटक्के, दामोदरजी द्विवेदी या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.