सर्व पोलीस अधिकारी व कर्मचा-यांची तपासणी करण्यात येऊन त्यांना आरोग्य सुरक्षा किटचे वितरण.
चंद्रपूर:- कोरोना युद्धात पोलिसांची भूमिका महत्त्वाची आहे. आपला जीव धोक्यात घालून पोलीस जनसेवेत तैनात आहेत. न दिसणा-या कोविड १९ या शत्रूशी हा लढा आहे. नागरिकांचे आरोग्य राखताना व कर्तव्य बजावताना पोलिसांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे प्रतिपादन जि. प. अध्यक्ष संध्या गुरनुले यांनी केले. त्या भारतीय जनता पार्टी जिल्हा चंद्रपुरतर्फे मूल पोलीस स्टेशन येथे आयोजित आरोग्य तपासणी व आरोग्य सुरक्षा किट वितरण उपक्रमात गुरुवार (१४ मे) ला अध्यक्ष म्हणून बोलत होत्या. प्रारंभी डॉ गुलवाडे यांनी आरोग्य तपासणीची आवश्यकता विशद करीत, आत्मविश्वास उंचावण्यासाठी सुदृढ आरोग्य गरजेचे असल्यांचे सांगितले.
यावेळी सर्व पोलीस अधिकारी व कर्मचा-यांची तपासणी करण्यात येऊन त्यांना आरोग्य सुरक्षा किटचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.