Click Here...👇👇👇

अस्वलाच्या हल्ल्यात दोन मजूर जखमी. गोंडपिपरी तालुक्यातील घटना.

Bhairav Diwase
🔴तोहोगाव उपवन क्षेत्रातील घटना मजूरवर्ग दहशतीत.
🔴एकाच दिवशी एकाच तालुक्‍यात दोन वेगवेगळे हल्ले.
Bhairav Diwase.   May 15, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अमित उइके, गोंडपिपरी
गोंडपिपरी:- गोंडपिपरी तालुक्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये अस्वलाच्या हल्ल्यात दोघे जखमी झाले आहेत. पहिल्या घटनेत तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या एका मजुरावर अस्वलाने हल्ला केला आहे. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेमुळे तेंदूपत्ता संकलनासाठी जाणाऱ्या मजुरांमध्ये दहशत पसरली आहे.गोंडपिपरी तालुक्यात तेंदूपत्ता संकलनाचे काम सुरू झाले आहे. तालुक्यातील सरांडी गावातील निलकंठ बावणे हे एफडीसीएम वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या कक्ष क्रमांक 36 मध्ये तेंदूसंकलन करत होते. अचानक अस्वलाने त्यांच्यावर हल्ला केला. सहकाऱ्यांनी अस्वलाला पळवून लावल्याने त्यांचा जीव वाचला. जखमी अवस्थेत बावणे यांना तोहोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलविण्यात आले. तर, दुसऱ्या घटनेत वेजगाव येथील मारोती देवगडे हे अस्वलाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तोहगाव उपवन क्षेत्रातील घटना मजूर वर्गात दहशत.