कापशी येथील प्रभारी सरपंच सचिन सुधाकर तंगडपल्लीवार यांचेवर अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल.
Bhairav Diwase. May 05, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली: सावली तालुक्यातील कापशी येथील प्रभारी सरपंच सचिन सुधाकर तंगडपल्लीवार यांचेवर अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. कापशी येथील मजुर तेलंगणा राज्यात मिरची तोडण्यासाठी गेलेले होते ते परत आले, त्या मजुरांना जिल्हा परिषद शाळेमध्ये विलगीकरण ठेवण्यात आले आहे. फिर्यादी मंगलदास मारोती शेंडे यांनी आपल्या नातेवाईकांना शाळेच्या गेट बाहेरुन जेवणाबद्दल विचारपूस करीत होता. दरम्यान फिर्यादी म्हणाला की ग्रामपंचायतीने तुमच्या जेवणाची व्यवस्था केली असेलच असे बोलत असतानाच प्रभारी सरपंच सचिन तंगडपल्लीवार तेथे येऊन शिवीगाळ केली. फिर्यादी म्हणाला की' जातीवाचक शिवीगाळ कशाला करता, काय सांगायचं आहे ते प्रेमाने सांगा. असे बोलण्यावरून आरोपींनी फिर्यादीस हाता बुक्याने, पायाने व काठीने मारहाण केली.
यावरून फिर्यादीने पोलीस स्टेशन सावली येथे तक्रार नोंदविली असता आरोपीविरुद्ध भा द वि 323, 324 व अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम अन्वये 3(1)(r), 3 (1)(s), व 3 (2) (va) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपी हे माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती व विद्यमान जिल्हा परिषद सदस्य संतोष तंगडपल्लीवार यांचे बंधू आहेत हे विशेष. वृत्त लिहेपर्यन्त आरोपीस अटक करण्यात आली नव्हती. शिवाय कापशी येथे आत्तापर्यंत ही तिसरी घटना असल्याचे बोलले जात आहे. पुढील तपास राजुरा येथील उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्नील जाधव करीत आहेत.