मुल तालुका प्रशासनाने याची दखल घेत पोडसा मार्गावरुन मजुरांना स्वगावी आणण्यासाठी गाड्यांची व्यवस्था करावी.
Bhairav Diwase. May 05, 2020
मुल: कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण भारतात संचारबंदी लागू केली गेली आहे. परंतु संचारबंदीपूर्वी देशभरातील विविध भागांत काम करण्यासाठी गेलेले मजूर बांधव अनेक राज्यांत अडकून पडलेले आहेत. अश्या वेळी त्यांची होणारी गैरसोय बघता सरकारच्यावतीने थोडी शिथिलता देऊन त्यांना स्वगावी जाण्याची मुभा देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत आंध्रप्रदेश राज्यात मिरची तोडण्यासाठी चंद्रपूर पट्ट्यातील अनेक मजूर बांधव गेल्याने अडकून होते. आणि आता सरकारने थोडी मुभा दिल्याने हे मजूर बांधव वाहनांअभावी तेलंगण्याहून पायी-पायी स्वगावी निघाले. पण अजून मुल तालुक्यातील 600 मजूर आंध्रप्रदेश आणि महाराष्ट्र सीमेवरील पोडसा मार्गावर स्वगावी येण्यासाठी प्रतीक्षेत आहे. त्यांना मुल तालुक्यातील आपल्या स्वगावी आणण्यासाठी पंचायत समिती प्रशासनानी गाडीची व्यवस्था करून लवकरात लवकर स्वगावी आणण्यासाठी दखल घ्यावी. आंध्रप्रदेश आणि महाराष्ट्र सीमेवरील पोडसा मार्गावर चंद्रपूर जिल्ह्यातील मिरची तोडायला गेलेल्या, सर्व मजूरांना त्या तालुक्यातील पंचायत समिती प्रशासनाने गाडीची व्यवस्था करून स्वगावी परत आणत आहे. परंतु मुल तालुक्यातील 600 मजूर अजून पर्यंत सर्व गावी पोहोचू शकले नाही. तरी मुल तालुका प्रशासनाने याची दखल घेत पोडसा मार्गावरुन मजुरांना स्वगावी येण्यासाठी गाड्यांची व्यवस्था करावी.