माहिती मिळताचं स्थानिक भाजपा पदाधिकाऱ्यांचे हात मदतीसाठी सरसावले.
रात्रीच्या भोजणासह सकाळी वाहनांची केली व्यवस्था.
Bhairav Diwase. May 05, 2020
मुल: कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण भारतात संचारबंदी लागू केली गेली आहे. परंतु संचारबंदीपूर्वी देशभरातील विविध भागांत काम करण्यासाठी गेलेले मजूर बांधव अनेक राज्यांत अडकून पडलेले आहेत. अश्या वेळी त्यांची होणारी गैरसोय बघता सरकारच्यावतीने थोडी शिथिलता देऊन त्यांना स्वगावी जाण्याची मुभा देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत तेलंगणा राज्यात मिरची तोडण्यासाठी चंद्रपूर-गडचिरोली पट्ट्यातील अनेक मजूर बांधव गेल्याने अडकून होते. आणि आता सरकारने थोडी मुभा दिल्याने हे मजूर बांधव वाहनांअभावी तेलंगण्याहून पायी-पायी स्वगावी निघाले असता त्यांनी काल रात्री मुल येथे विश्रांती घेतली. भर उन्हाच्या तडाख्यात रस्ताचे पायी अंतर कापल्याने कित्येकांच्या पायांना फोळे सुद्धा आल्याचे दिसून आले.
यांचास्तान शहरात आल्याचे कळताचं जि. प. अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले, मूल नगरपरिषदेचे पदाधिकारी, स्थानिक भाजपा पदाधिकारी आदिंनी त्यांना गाठून त्यांच्या रात्रभर निवासाची व भोजनाची व्यवस्था केली. आणि आज सकाळी शहरामधिल वाहनांची व्यवस्था करून त्यांना गडचिरोली जिल्हात ठिकठिकाणी पोहोचवून देण्यासाठी सदर वाहने रवाना करण्यात आली. यावेळी, जि.प. अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले, शहराच्या नगराध्यक्षा सौ. रत्नमाला भोयर, उपनगराध्यक्ष नंदू रणदिवे, भाजपा शहराध्यक्ष प्रभाकर भोयर, नगरसेवक प्रशांत समर्थ, राकेश ठाकरे, कीशोर कापगते आणि महेंद्र करकाडे यांसह आदि मंडळी उपस्थित होते.