ग्रामपंचायतमार्फत त्यांना साबन व सॅनिटायझर देवून तर वैद्यकीय अधिकाऱ्याकडून आरोग्य तपासणी व विलगिकरण करुण ठेवण्यात आले.
Bhairav Diwase. May 04, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली: देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सरकारने अनेक उपाय योजना केल्या त्यामध्ये संचारबंदी लॉकडाउन करण्यात आले पण बाहेर राज्यात गेलेले मजूर, विद्यार्थी व भाविक लॉकडाउनमुळे सर्व जिथे होते तिथेच अडकले होते. केंद्र सरकार, तेलंगाना सरकार, जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनाने व सहकार्यांने मागील दोन दिवसांपासून अनेक मजूर आपल्या स्वगावी परतले आहेत.
त्यामुळे तालुक्यातील सर्व शाळामध्ये, नदीच्या किनारी व शेतात त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली आहे.तालुकात आलेल्या सर्व मजुरांची वैद्यकीय अधिकारी यांचे समक्ष त्यांची आरोग्य तपासणी करून विलगिकरण करण्यात आले आहे. जिबगांव, लोंढोली, साखरी, जांब बुज, डोनाळा, हरांबा व इतर गावात लोंढोली आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ देवतळे, डॉ. पवार, आत्राम सिस्टर, इतर कर्मचारी, गावातील सरपंच, त मु स अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिति अध्यक्ष, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायतमार्फत त्यांना साबन व सॅनिटायझर देवून तर वैद्यकीय अधिकाऱ्याकडून आरोग्य तपासणी व विलगिकरण करुण ठेवण्यात येत आहे. काही मजूर आले असले तरी अजूनही पुष्कळ मजूर स्वगावाकडे निघाल्याचे सांगितले जात आहे.