सावली तालुक्यातील डोनाळा येथे कोरोना मुळे साध्या पध्दतीने लावले विवाह.

Bhairav Diwase

ना वरात ना,गाजा वाजा, ना फटाके, ना नाचना, फक्त फुलांचे हार, कपळाला बांशिग व तोंडाला मास्क अशा साधा पध्दतीने विवाह संपन्न.
Bhairav Diwase.   May 06, 2020
  

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:
सावली तालुक्यातील डोनाळा गावात साध्या पद्धतीने विवाह पार पडला.अलीकडेच लग्न जोडलेले त्यात कोरोना वायरसने थैमान घेतल्यामुळे अनेकाचे विवाह थांबन्यात आले.लग्न म्हणजे जिवनातील आंनदाक्षण.अलीकडे नव्या पिढीत एक आनंद बनला आहे. परंतु कोरोना मुळे सर्व लाँकडाऊन झाल्या मुळे सर्व फुल मस्ती करणे कठीण झाले. आणि लग्नाची पत्रिका वाटून झाली. सर्वत्र लाँकडाऊन आता काय करायचं? असा प्रश्न दोन्ही पक्षांना पडला. दोन्ही कुटुंबांनी प्रभुदास खोब्रागडे अध्यक्ष महात्मा गांधी तंटामुक्त समीती व सरपंच सुखदेव बोदलकर यांनी माहिती दिली. सर्वत्र लाँकडाऊन असल्यामुळे आपण वाजा गाजा करता येणार नाही. कायदा हातात घेता येणार नाही. पण कायद्याचे पालन करून सोशल डिस्टिंग ठेवून व चार पाच नातेवाईक ठेवून विवाह लावण्याचा निश्चय केला. त्यानतंर सामदा येथील सोमेश्वर कुनघाडकर यांचा विवाह डोनाळा येथील दिक्षा बोदलकर हिच्याशी दि. 06/05/2020. ला सकाळी ९.३० वा. डोनाळा येथे विवाह लावण्यात आला. 

     त्यावेळी नवरदेवाकडून मामा, मावशी, काका तर नवरीकडील आई, वडील,  बहिण, काका, काकी, मामा, भाऊजी आणि भाऊ यांच्या उपस्थित प्रभुदास खोब्रागडे अध्यक्ष महात्मा गांधी तंटामुक्त समिती डोनाळा व सरपंच सुखदेव बोदलकर यांच्या उपस्थित विवाह सोहळा सोशल डिस्टिंग ठेवून पार पाडण्यात आला. ना वरात ना,गाजा वाजा, ना फटाके, ना नाचना, फक्त फुलांचे हार, कपळाला बांशिग व तोंडाला मास्क अशा साधा पध्दतीने विवाह संपन्न झाला.