पल्सर गाडीसह १० लिटर मोहा दारु जप्त.
Bhairav Diwase. May 06, 2020
सावली: अवैध दारू विक्रेते केव्हा काय करतील हे सांगता येत नाही. दारू तस्कर नवनवीन युक्त्या वापरून दारूची तस्करी करीत असल्याचे निदर्शनास येते. चक्क पल्सर च्या पेट्रोल टंकी मधेच त्यांनी दारू लपवून विक्रिस नेणार्या दुचाकी स्वरास पोलिसांनी पकड़ले खरे. मात्र दारू चा शोध
घेत त्यांनी टंकी मधेच दारू आहे असे सांगताच पोलिसांना ही आश्चर्य चा धक्का बसला.
देशात कोरोना विषाणूने थैमान घातलेले असून सर्वत्र लॉकडाउन करण्यात आला आहे. त्या पाश्वभुमीवर हिरापूर येथे नाकाबंदी दरम्यान येणाऱ्या जाणार्या वाहनांची तपासणी करतांना एम. एच. ३६ एन. ५६८४ दु चाकी पल्सर गाडी थांबवून तपासणी केली
असता सिटच्या खाली एक टँक आढळली. ही टैंक कशाची म्हणून पोलिसांनी तपास केला तर ति पेट्रोल साठी होती. समोरची पेट्रोल टैंक ही पूर्णता भरून होती. यात काय तर पेट्रोलच असेल असा समज सर्वजन करू लागले मात्र पोलिसांनी बारीक निरीक्षण केले तर त्यात चक्क मोह फुलाची बनावट दारू आढळली. त्या टँकमध्ये जवळपास १० लिटर गावठी दारु सापडली. पोलिसांनी गाडी जप्त करुन आरोपी राकेश भास्कर खांडरे जुनोना चंद्रपुर याच्या विरुद्ध मुदाका अंतर्गत 65 (ई) अन्वये गुन्हा दाखल केला. सदर दारू ही सावली तालुक्यातील किसान नगर येथून आणल्याचे सांगितले. यावेळी नाकाबंदी दरम्यान पो. काँ. सुमीत मेश्राम, अविनाश बांबोळे, प्रफुल आळे आदी उपस्थित होते. पुढील तपास ठानेदार बाळासाहेब खाडे यांचा मार्गदर्शन मधे सुरु आहे.