चंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉसिटीव्ह रुग्ण.

Bhairav Diwase
नागरिकांनी खबरदारी घ्यावी जिल्हा प्रशासनाने आवाहन.
बंगाली कॅम्प परिसरातील क्रिष्णानगर सील 
Bhairav Diwase.    May 02, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी)वैभव एनपल्लीवार, चंद्रपर
चंद्रपूर: गेल्या महिनाभरापेक्षा अधिक काळ कोरोना निगेटिव्ह असणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज शानिवारी सायंकाळी 8:30 वाजता एका रुग्णाचा नमुना पॉझिटिव्ह आला आहे. चंद्रपूर महानगरातील बंगाली कॅम्प परिसरात असणाऱ्या क्रिष्णा नगर भागाला पूर्णतः बंद करण्यात आले आहे.
      जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून न जाता अधिक जबाबदारीने लॉक डाऊन पाळावे, असे आवाहन केले आहे. नागपूर विभागात नागपूर, भंडारा पाठोपाठ आता चंद्रपूरमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. विभागात वर्धा, गोंदिया व गडचिरोली या जिल्ह्यात एकही कोरोना रुग्ण नाही.
        जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड यांनी सायंकाळी साडेआठ वाजता 50 वर्षीय एक पुरुष कोरोना पॉझिटिव निघाला असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने हा परिसर सील केला आहे. परिसरात या आजाराचा फैलाव होऊ नये यासाठी रात्रीच कडेकोट बंदोबस्त करण्यात आला.उद्यापासून महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी स्पष्ट केले आहे.