मुल तालुक्यातील चिचाळा आणि उथळपेठचे नागरिक आपल्या गावासाठी रवाना.

∆ सुधीर भाऊंनी मुल नगर परिषदेचे उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे यांच्याशी संपर्क. ∆ नंदू भाऊंनी लगेच ट्रॅव्हल्स बस ची परवानगी काढून बस बॉर्डर ला रवानगी.
Bhairav Diwase.    May 03, 2020
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य संपादक)भैरव दिवसे, जिल्हा चंद्रपूर
मुल: मुल तालुक्यातील उथळपेठ आणि चिचाळा गावातील नागरिक मिरची काढण्यासाठी तेलंगाणा मध्ये गेले होते, पण लाॅकडाउन मुळे ते तिथेच अडकून पडले होते. पण आता बाहेर राज्यातील कामासाठी गेलेल्या सर्व लोकांना आपल्या राज्यात आणले जात आहे. बाहेर राज्यातील सर्व मजुरांना स्वगावी परवानगी काढून परत येण्यासाठी पूर्ण मार्गदर्शन आदरणीय सुधीरभाऊ मार्फत करण्यात आले. आणि तेलंगाणा वरून लक्कडकोट बॉर्डर पर्यंत सोडण्याची व्यवस्था झाली. तसेच बॉर्डर वरून गावाकडे परत येण्यासाठी सुधीर भाऊंनी मुल नगर परिषदेचे उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे यांच्याशी संपर्क करायला सांगितले, नंदू भाऊंनी लगेच ट्रॅव्हल्स बस ची परवानगी काढून बस बॉर्डर ला रवानगी केली. आणि सर्व चिचाळा आणि उथळपेठ चे नागरिक नुकतेच आपल्या गावासाठी रवाना झाले. पलिंदर सातपुते सरपंच उथळपेळ यांनी सुधीर भाऊंचे आभार मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने