Top News

डॉ. अंकीत विलास मेश्राम मुंबई येथे कोरोना विषाणूच्या लढ्यात आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यामुळे त्यांचा सत्कार म्हणुन त्यांच्या आईचा सत्कार करण्यात आला :- महापौर सौ. राखी संजय कंचर्लावार.

चंद्रपुर शहर नगरपालिका महापौर सौ. राखी संजय कंचर्लावार यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन चंद्रपूर जिल्ह्यातील श्रीमती. डॉ पुर्णिमा विलास मेश्राम यांचा सत्कार.
Bhairav Diwase.    May 17, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी)वैभव एनपल्लीवार, चंद्रपर
चंद्रपूर:- काेराेना विषाणू ने जगाला हादरवून साेडलेला आहे. भारतातही काेराेना ग्रस्तांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. राज्यातही कोरोना विषाणू ने कहर घातलेला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना विषाणूचा जरी २ रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे प्रशासना कडून याेग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. सध्या जगभरात कोरोना व्हायरस ने थैमान घातले असून, त्याचे पडसाद भारतातही दिसू लागले, महाराष्ट्रात सुद्धा कोरोना चे रुग्ण आढळले, या कोरोना वर मात करण्यासाठी शासनाने लॉकडाऊन जाहीर करून, शासनस्तरावर अनेक उपाययोजना सुरू केल्या आहेत. नागरिक सुरक्षित राहण्यासाठी, पोलिस दल, डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्यसेवक, सफाई कामगार, सरकारी कामगार, सेवाभावी संस्था, पत्रकार, सुरक्षा रक्षक, शेतकरी, भाजी विक्रेते, अत्यावश्यक सेवा पुरवणारे अहोरात्र काम करत आहे. सर्वांनी आपली आणि घरच्यांची नीट काळजी घ्यावी, वारंवार आपले हात स्वच्छ धुवावेत, सुरक्षित अंतर ठेवा, विनाकारण घरा बाहेर पडू नका, डोळे, नाक, आणि तोंडाला स्पर्श टाळा,  शिंकताना व खोकताना आपल्या नाकावर आणि तोंडावर रूमाल ठेवा. डॉक्टर कडून वारंवार  आपल्या सांगण्यात येत आहे. संपुर्ण जगात कोरोना (कोविड-१९)  विषाणूचा प्रादुर्भाव सुरू आहे. या विषाणूला  लढा देण्यास मेडिकल स्टाफ आपल्या जिवाची पर्वा न करता लढा देत आहे. 
         अशातच आपले कर्तव्य बजावत असणारे श्रीमती. डॉ पुर्णिमा विलास मेश्राम प्राध्यापिका, चिंतामणी कॉलेज ऑफ कॉमर्स पोंभूर्णा  यांचे सुपुत्र डॉ. अंकीत विलास मेश्राम, MBBS, Ms orthopaedics, Fellowships-Arthroplasty & Trauma हे PGMO (medical officer) at Hospital in Malad, Mumbai मध्ये कोविड केअर सेंटरमध्ये कर्तव्यदक्षतेने सेवा प्रदान करत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचे २ रूग्ण आढळले. पण मुंबई येथे कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे मुंबईची कोरोना रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात असलेले  डॉ. अंकीत विलास मेश्राम, हे सध्या Hospital in Malad, Mumbai मध्ये कोविड केअर सेंटरमध्ये जिवाची पर्वा न करता कोरोना रूग्णांवर उपचार करत आहे. चंद्रपूरांसाठी ही बाब अभिमानाची आहे. त्यांचे जितके कौतुक केले तेवढे कमीच आहे. त्यांचे कार्य आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. 

न्युज व्हिडिओ पहा:-  https://youtu.be/3pcoJWbCMjI

      असे चंद्रपुर शहर नगरपालिका महापौर सौ. राखी संजय कंचर्लावार यांनी म्हटले. चंद्रपूर जिल्ह्यातील श्रीमती. डॉ पुर्णिमा विलास मेश्राम प्राध्यापिका, चिंतामणी कॉलेज ऑफ कॉमर्स पोंभूर्णा यांच्या चंद्रपुर येथील राहते घरी जाऊन भेट घेतली. डॉ. अंकीत विलास मेश्राम हे मुंबई कोरोना विषाणूच्या लढ्यात आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यामुळे त्यांचा सत्कार म्हणुन  त्यांच्या आईचा सत्कार करण्यात आले. चंद्रपुर शहर नगरपालिका महापौर सौ. राखी संजय कंचर्लावार यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन चंद्रपूर जिल्ह्यातील श्रीमती. डॉ पुर्णिमा विलास मेश्राम प्राध्यापिका, चिंतामणी कॉलेज ऑफ कॉमर्स पोंभूर्णा यांचा सत्कार करण्यात आला.  व त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिण्यात आले.

    यावेळी नगरसेवक संजय कंचर्लावार, ठावरी नगरसेवक, राहुल घोटेकर नगरसेवक, डॉ बाबासाहेब आंबेडकर कॉलेजचे संस्थापक, चंद्रपुर महानगरपालिकाचे सर्व नगरसेवक, मयुर प्लाॅट मध्ये असलेले रहिवासी, आणि मित्रपरिवार उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने