साखरी ते सामदा घाटावरुन रोज होतेय रेतीची तस्करी.

Bhairav Diwase
सायंकाळी व रात्री होते अवैध रेतीची तस्करी
Bhairav Diwase.   May 30, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- सावली तालुक्यातील सर्वच नदी चे घाट बंद असतांनाही रोज संपूर्ण घाटावरुन अनेक ट्रॅक्टर ब्रास रेतीचे अवैध उत्खनन केल्या जात असून या अवैध उत्खनन व वाहतुकी कड़े महसूल प्रशासनाचे जाणीव पूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.आणि पत्रकारांनी बातमी करीता माहिती गोळा करण्यास गेल्यास हल्ला करीत असतात. त्यामुळे या अवैध वाहतुक दारांच्या पाठीशी कोण असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे . सावली तालुक्याची गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेली ७५ टक्के सीमा ही वैनगंगा नदि च्या पात्राने व्यापलेली आहे. सावली तालुक्यात साखरी व सामदा या घाटावरुन राजरोस पणे अवैध रित्या रेती ची वाहने भरून जात आहे. रात्रो पासून या गोरखधंद्या ला सुरुवात होत असून तो दहापर्यंत चालतो. सायंकाळी पुन्हा हा अवैध रेतीची तस्करी चालत असल्याचा प्रकार दिसत आहे.या संदर्भात महसूल प्रशासन यांचे पूर्णता दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. 'सब कुछ बराबर है' असे म्हणत हे अवैध व्यवसायी निडर होऊन ही वाहतूक खुले आमपणे करित असल्याने शासनाचा महसूल डुबत आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह निर्माण केल्या जात आहे .