सावली तालुक्यातील अंतरगाव येथे बाहेरून आलेल्या मजुरांना विलगिकरण व आरोग्य तपासणी.

Bhairav Diwase
प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या पुढाकारातुन व ग्राम सुरक्षा दल अंतरगाव यांच्या सहकार्य.
Bhairav Diwase.   May 09, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सरकारने अनेक उपाय योजना केल्या त्यामध्ये संचारबंदी लॉकडाउन करण्यात आले पण बाहेर राज्यात गेलेले मजूर,विद्यार्थी व भाविक लॉकडाउनमुळे सर्व जिथे होते तिथेच अडकले होते. केंद्र सरकार, तेलंगाना सरकार, जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनाने व सहकार्यांने मागील दोन दिवसांपासून अनेक मजूर आपल्या स्वगावी परतले आहेत. त्यामुळे शाळामध्ये त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली आहे. तालुकात आलेल्या सर्व मजुरांची वैद्यकीय अधिकारी यांचे समक्ष त्यांची आरोग्य तपासणी करून विलगीकरण करण्यात आले आहे. अंतरगावमधे प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या पुढाकारातुन व ग्राम सुरक्षा दल अंतरगाव यांच्या सहकार्यातुन अधिकारी डॉ. सुरज म्हस्के सर, चव्हाण सर औषध वितरण अधिकारी  राणे सिस्टर, सफाई कामगार ईश्वर करकाडे,  तंटामुक्ती अध्यक्ष पंकज कागदेलवार.ग्राम सुरक्षा दलाचे सदस्य. छगन ऊंदिरवाडे पो.पा. अंतरगाव, लेखाराम हुलके, अतुल पेटकर, दिपक करकाडे, मोरेश्वर शेंडे, प्राचिन ढवळे, विवेक राऊत, वसंत तरारे, आशा वर्कर  करकाडे ताई, आंगणवाडी सेविका हुलके ताई यांच्या उपस्थितीत  वैद्यकीय अधिकाऱ्याकडून 140 मजुरांची आरोग्य तपासणी  करण्यात आली. व मजुरांना किरकोड असलेल्या आजरांवर औषध उपचार करण्यात आला.वरील ऊपक्रम ग्राम सुरक्षा दल अंतरगाव यांच्या सहकार्याने योग्य रीतीने आणि शांततेत पार पडला.