'डीप क्लीनिंग ' मोहिमेची सुरवात आजपासुन करण्यात आली असून महापौर राखी कंचर्लावार यांनी आज पाहणी.
Bhairav Diwase. May 09, 2020
चंद्रपूर:- करोना संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे १५ एप्रिल पासुन स्वछता मोहीम शहराच्या मुख्य रस्त्यांवर सातत्याने राबविली जात आहे. आता शहराच्या कानाकोपऱ्यात पोहचण्यास 'डीप क्लीनिंग ' मोहिमेची सुरवात आजपासुन करण्यात आली असून महापौर राखी कंचर्लावार यांनी आज पाहणी करून मोहिमेस गती देण्याचे निर्देश दिले.
सिव्हिल लाईन येथील लक्ष्मी नगर परीसरात सुरु असलेल्या नाली सफाईची पाहणी करून या कोरोना संकटात आपल्या शहराची संपुर्ण स्वच्छता राखुन करोनाविरुद्धचा लढ्याला बळकटी देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. ' डीप क्लीनिंग ' मोहीमेअंतर्गत नाली सफाई, गाळ उचलणे ,रोड झडाई, फॉगींग, फवारणी, सफाई व निर्जंतुकीकरण असे एक संपुर्ण स्वछता अभियानच राबविले जात आहे
दरदिवशी शहराच्या एका परीसरात संपुर्ण स्वछता मोहीम राबवून शहरातील प्रत्येक वार्ड, झोनमधे नियोजनबद्धरीत्या स्वच्छता करण्यात येत आहे, लवकरच संपुर्ण चंद्रपूर शहराचे डीप क्लीनिंग पार पडणार आहे. राज्यात करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे युद्ध स्तरावर सफाई मोहीम राबविली जात आहे.
भविष्यात उद्भवणारी आपात्कालीन सदृश्य परिस्थिती हाताळण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिका आरोग्य व सफाई कर्मचारी नियमित सेवा देत आहेत. शहर निर्जंतुकीकरण करण्याच्या दृष्टीने मनपा प्रशासनाने युद्ध स्तरावर सम्पूर्ण शहरात फवारणी, धुरळणी, आवश्यक ठिकाणी जंतुनाशक पावडरचा छिडकाव नियमीत सुरू आहे, बाजार परीसर ,रेल्वे स्टेशन,बस स्टँड, वर्दळीची ठिकाणे, पब्लिक कम्युनिटी टॉयलेट ,दवाखाने येथे फवारणी धुरळणी व निर्जंतुकीकरण मोहीम सातत्याने राबविण्यात येत आहे.
करोना विषाणूचा संसर्ग देशात झपाट्याने पसरत असताना संपूर्ण देशात लॉक डाऊन आहे, नागरिकांनी आपली काळजी स्वतः घ्यायची आहे, या संचारबंदीत जीवनावश्यक वस्तू साठी घराबाहेर पडा, परंतु गरज नसताना घराबाहेर निघू नये असा सल्ला प्रशासनातर्फे देण्यात येत आहे. जनतेचे आरोग्य योग्य व सुदृढ रहावे म्हणून देशासाठी सेवा प्रदान करणारे मनपा कामगार अहोरात्र परिश्रम घेत आहेत. याप्रसंगी महापौर राखी कंचर्लावार, आयुक्त राजेश मोहीते, सहायक आयुक्त धनंजय सरनाईक उपस्थित होते.