शेतकऱ्यावर आर्थिक संकट.
Bhairav Diwase. May 08, 2020
चंद्रपूर:- देशामध्ये कोरोना रोगांचे सावट येऊन पडले त्यामुळे देशावर आर्थिक संकट कोसळले.आणि एकीकडे शेतकऱ्यावर सुद्धा हीच परस्थिती निर्माण झाल्याचे दिसून येते.खासगी व्यापारी शेतकऱ्याकडून कवडीमोल भावाने कापसाची खरेदी करत आहे. सी सी आय अंतर्गत कापूस विक्री करावे तर कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये ७००० ते ८००० पर्यंत नोंदणी केली. मात्र दरदिवशी फक्त ६० गाड्या घेतल्या जात आहे. सीसीआय मध्ये नंबर येण्यास वेळ लागत असल्याने शेतकरी खासगी व्यापाऱ्यांकडे कापूस विक्रीसाठी नेत आहे. शेतकऱ्याचा कापूस १,५०० रुपये पासून ४,००० पर्यंत खरेदी केल्या जात असून सीसीआय खरेदी ही ५,४०० असून शेतकऱ्यांना जवळपास १२०० ते १४०० रूपाने नुकसान आहे.
म्हणून जगाचा पोशिंदा शेतकरी यांच्यावर खूप आर्थिक संकट कोसळले. शेतकऱ्याचा डोळ्यासमोर येणार हंगाम आणि शेतकऱ्यावर असलेले बँकांचे कर्ज कसे भरायचे. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा असे प्रश्न शेतकऱ्यांना सतावत असते. शासनाने या कडे लक्ष दिले पाहिजे. जेने करून शेतकरी आर्थिक संकटात सापडणार नाही.
फाॅरवर्ड करण्यापूर्वी माहिती नीट तपासून घ्या.