Click Here...👇👇👇

चंद्रपूर जिल्ह्यात दि 16 जूनला श्री राम सेने कडून रक्तदान शिबीर.

Bhairav Diwase
32 रक्तदात्यानी केले रक्तदान.
   Bhairav Diwase.   June 16, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- कोरोनाच्या वैश्विक महामारी संकटाचा सामना करण्यासाठी जि प प्रशासन सज्ज आहे. आमचे पोलिस, अधिकारी, डॉक्टर्स सेवा देत असताना शेकडो आशा वर्कर, अंगणवाडी सेविका जीव धोक्यात घालून लढा देत आहेत. रक्तदान सुद्धा या लढ्याचा भाग आहे. कोरोना विषाणुच्‍या वाढत्‍या प्रादुर्भावामुळे सुरू असलेल्‍या लॉकडाऊनमुळे रक्‍ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. 

न्युज व्हिडिओ पहा:-  https://youtu.be/2tAydeUMg_o

त्या पार्श्वभूमीवर चंद्रपुर जिल्ह्यात  दि 16 जून 2000 ला श्री राम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. रंजीतभाऊ  सफेलकर‌, राष्ट्रीय उपाध्यक्ष आकाशभाऊ सफेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री राम सेना चंद्रपूर येथे जिल्हा अध्यक्ष शशी भैयाजी, ग्रामिण अध्यक्ष अजय यादव यांच्या नेतृत्वाखाली रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात एकूण 32 रक्तदात्यानी रक्तदान केले, या कार्यक्रमात उपस्थित विठ्ठलराव बल्की, रुपेश रणदिवे, कलपेश रणदिवे, निलेश गुज्जर, वैभव ऐनपल्लीवार, सचिन हरणे, आशिष बोंडे,  सौरभ चिलके, रोशन चिलके, चिरंजीवी पाल, संदिप पोडे, ब्रिजेशजी यादव, रामनारायण रविदास, उद्य सिंह, तेजस दवे, व अन्य मान्यवर उपस्थित होते.