सामाजिक कार्यकर्ते जाण असलेले तथा राष्ट्रीय युवा स्वयंसेवक व राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक, राजेश हजारे याची निवड.
Bhairav Diwase. June 16, 2020
चंद्रपूर:- देशातील तरुणाईला दिशादर्शक असणारी व राष्ट्रीय एकात्मतेसाठी विविध उपक्रम राबवणारी नॅशनल युथ कौन्सिल ऑफ इंडिया अर्थातच भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेच्या चंद्रपूर जिल्हा अध्यक्षपदी राजेश हजारे याची निवड करण्यात आली आहे. येथील सामाजिक कार्यकर्ते जाण असलेले तथा राष्ट्रीय युवा स्वयंसेवक व राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक, राजेश हजारे याची निवड करण्यात आली. दि. १५ जून रोजी त्यांना निवडपत्र प्राप्त झाले. या सेवाभावी युवकांचे क्रिडा, सामाजिक व तरुण युवा नेतृत्व शैक्षणिक क्षेत्रातील कार्य लक्षात घेता युवा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रामू यांच्या मार्गदर्शनाने राज्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. त्रेवीणीकुमार कोरे यांनी ही निवड केली आहे.
युवा परिषदेच्या माध्यमातून युवकांचा सामाजिक कार्यात सहभाग वाढवून विधायक कार्य करण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यापूर्वी राजेश हजारे यांनी उत्कृष्ट स्वयंसेवक महाराष्ट्र राज्य, आदर्श युवा पुरस्काराने सन्मानित व राष्ट्रीय युवा स्वयंसेवकांच्या, नेहरू युवा मंडळाच्या माध्यमात, राजा प्रसेजीत संस्थेच्या माध्यमातून व राष्ट्रीय सेवा योजनेच्या विवीध शिबिरांत सहभागी होवून सामाजिक कार्यात अगेसर असतात. विविध क्षेत्रात कार्य करणारे सेवाभावी युवक म्हणून या युवकांची समाजात ओळख राहिली असून त्यांच्या या निवडीबद्दल राज्य सचिव कमलेश सोनवणे, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना उत्कृष्ट स्वयंसेवक सामाजिक कार्यकर्ता आकाश धनगर, जळगाव प्रविण पट्टेबहादूर राजा प्रसेजीत संस्थाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते केकतउमरा, सामाजिक कार्यकर्ते महेश खडसे, रा.से.यो स्वयंसेवक अजय राजे, युवा कार्यकर्ते वैभव वाकुडकर, विक्की पट्टेबहादूर, दीपक पट्टेबहादूर, अतिश टापरे यांनी अभिनंदन केले आहे तर सर्वस्तरातून कौतुक होत आहे.