लवकरात लवकर नाली सफाई केली जावी अशी मागणी पाथरी ग्रामवासीयांकडून केली जात आहे.
Bhairav Diwase. June 16, 2020
सावली:- संपूर्ण राज्यात मान्सून धडकले आहे त्यामुळे एन पावसाळा ऋतू ला सुरुवात झाली असून पाथरी येथील अंतर्गत नालीचे सफाईचे काम अजूनही पूर्ण न झाल्याने विकास कामाचे ढोल वाजवणाऱ्या पाथरी येथील ग्रामपंचायत चा निष्क्रिय पणा पुढे आला आहे.
सध्या देशात कोरोनाचे सावट असून संपूर्ण देशामध्ये शासन, प्रशासन व जनता कोरोनाशी दोन हात करीत असून आरोग्याची खबरदारी घेत शासन तथा प्रशासनाने स्वछता पाळण्याचे आव्हाहन केले आहे. त्या अनुषंगाने जनता स्वतःची काळजी घेत आहे. पावसाळा सुरु झाला असून शहरी तथा ग्रामीण भागात स्वच्छतेच्या दृष्टीने अंतर्गत नाली सफाईचे काम पावसाळा सुरु होण्याच्या आधीच पूर्ण केले जाते परंतु विकास कामाचा ढोल वाजवणारी सावली तालुक्यातील पाथरी ग्रामपंचायत चा निष्क्रिय पणा समोर आला आहे. खरं तर अंतर्गत नाली सफाईचे काम हे उन्हाळ्याच्या सरते शेवटी केल्या गेल्यास नालीतील सुखा तसेच ओला कचरा संपूर्ण घाण काढायला सोईस्कर होते. परंतु पाथरी येथील ग्रामपंचायत दरवर्षी स्वच्छतेकडे दुर्लक्ष करीत असून पावसाळा सुरु झाल्यावरच नाली सफाईचे काम करीत असल्यामुळे नालीतील कचरा पावसामुळं ओला होत असून सफाई करताना.
त्याच नालीच्या पुढे आधी वाळवत ठेवतात जर परत पाऊस आला तर नालीच्या बाहेर काढलेला कचरा पावसामुळे कुठेही वाहत जात असून पूर्ण रस्त्यावर घाण निर्माण होऊन नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने धोक्याचे आहे. त्यातच कोरोना महामारीचे राक्षस तांडव करत आहे ही माहिती असताना सुद्धा पाथरी ग्रामपंचायत कडून अंतर्गत नाली सफाईचे काम पावसाळा सुरु होऊनही अर्धवटच आहे. त्यामुळे विकासकामांचा ढोल वाजविणाऱ्या पाथरी ग्रामपंचायतीचा निष्क्रिय पणा पुढे आला असून पाथरी ग्रामवासीयांचे आरोग्य धोक्यात असून नाहक त्रास सहन करावे लागत आहे. त्यामुळे लवकरात लवकर नाली सफाई केली जावी अशी मागणी पाथरी ग्रामवासीयांकडून केली जात आहे.