500 मीटर नालीच्या कामाशाठी रस्त्यावर पडले रेतीचे ढिगारे.

सावली तालुक्यातील जिबगाव नालीचे बांधकाम.

तलाठ्यांकडून पाहणी.

रेतीच्या चोरट्या वाहतुकीचा धडाका.
Bhairav Diwase.   June 26, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- रेती घाटाचे लिलाव नाही गरीब जनतेच्या घर बांधकामाला रेती मिळत नाही परंतु कंत्राटदाराच्या कामाला मात्र रेतीचे ढिगारे दिसत आहे असाच प्रकार जिबगाव येते सुरू आसलेल्या नालीच्या बांधकामा वरून दिसून येत आहे नालीच्या बांधकामासाठी सात ते आठ ब्रस पडलेल्या रेतीच्या ढिगार्याची माहिती होताच तलाठ्याने पाहणी  करून पंचनामा  केला आणि वरिष्ठाकडे अहवाल पाठवण्याचे सांगण्यात आले आहे तालुक्यातील जिबगाव येथे सक्तिमाता ते माऊली मंदिर नेताजी भोयार यांच्या घरापर्यंत पाचशे मीटर नाली बांधकामाचे काम सुरू आहे  लक्षावधी च्या कामात नालीचे बांधकाम योग्य कंत्राटदार मार्फत होत नसल्याचा आरोप गावकऱ्यांकडून केला जात आहे एन पावसाळ्याच्या दिवसात सदर माली  बांधकामाला सुरुवात करण्यात आली त्यामुळे नाली बांधकामाच्या गुणवत्तेकडे लक्ष न देता नालीचे बांधकाम कसे पूर्ण करण्यात येईल यादृष्टीने कंत्राटदारांनी नाली बांधकामाचा धडाका लावला असून खोदकामात योग्य बोल्ड डरचा आणि बेडाचा उपयोग न करता कामाला सुरुवात केली जात आहे  परिणामी नाली बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण केला जात आहे त्यामुळे लक्षावधी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या नालीचे काम व्यर्थ जाणार की काय आल्पावधिताच नालीची वाट लागेल की काय असा आंदाज वर्तविली जात आहे दरम्यानच्या काळात रेती घाटाचे लिलाव नसतांना नालीच्या बांध कमशाठी रेतीचे ढिगारे आले कुठून याच नालीच्या बांधकामाला कशी रेतीची परवानगी मिळाली रेतीचे ढिगारे पडले असताना अधिकारी गेले कुठे असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे मग नालीच्या बांधकामासाठी चोरट्या रेतीचा तर वापर होत नसेल मात्र सुटीच्या आणि पहाटे चार वाजता पासून अनेक घाटावरून रेती चोरली जाण्याचा सपाटा सुरू असल्याने याच मार्गाने सदरच्या कामावर रेतीचे ढिगारे पडले असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे तेव्हा वरिष्ठांनी याची गंभीर दखल घेऊन नाली बांधकाम ठिकाणी पडलेल्या रेतीची आणि नाली बांधकामाची योग्य चौकशी करावी अशी मागणी जोर धरत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने