ऑटोरिक्षा चालकांचे घरांचे स्वप्न पुर्ण झाल्याचा मनापासून आनंद - आ. सुधीर मुनगंटीवार.

ऑटोरिक्षा चालकांच्या या घरांच्या वसाहतीला कै. चांगुणाबाई मुनगंटीवार कॉलनी असे नाव.
Bhairav Diwase.   June 26, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- ऑटोरिक्षा चालकांना 10 लक्ष रूपये किंमतीची घरे 4.50 लक्ष रू. किंमतीत मिळण्यासाठी मी केलेल्या प्रयत्नांना यश प्राप्त झाले. आज ती घरे ऑटोरिक्षा चालकांना प्रदान करताना मला मनापासून आनंद होत आहे. मी अर्थमंत्री असताना ऑटोरिक्षा चालकांसाठी एक कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची घोषणा अर्थसंकल्पात केली. त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. हे मंडळ स्थापन करण्याची प्रक्रिया अद्याप जारी आहे, परंतु विधानसभेत संसदीय आयुधांचा वापर करून हे मंडळ स्थापन करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करेन अशी ग्वाही माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

चंद्रपूर येथील म्हाडा कॉलनीत ऑटोरिक्षा चालकांना घरे प्रदान करण्याच्यां सोहळयात आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांनी विशेष बाब या सदराखाली 100 ऑटोरिक्षा चालकांना 10 लक्ष रू. किंमतीची घरे 4.50 लक्ष रू. किंमतीत देण्यात आली आहे. ही घरे बांधून पूर्ण झाली असून आज ती आ. मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत ऑटोरिक्षा चालकांना सुपुर्द करण्यात आली. ऑटोरिक्षा चालकांच्या या घरांच्या वसाहतीला कै. चांगुणाबाई मुनगंटीवार कॉलनी असे नाव देण्यात आले आहे. यावेळी ऑटोरिक्षा चालक-मालक संघटनेचे संस्था्पक अध्यक्ष राजेंद्र खांडेकर, जिल्हाध्यक्ष बळीराम शिंदे यांच्यासह अधिकारी व मान्यवरांची आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र खांडेकर यांनी केले. आम्ही आजवर जी मागणी आ. मुनगंटीवार यांच्याकडे केली तेव्हा ती मागणी त्यांनी प्राधान्याने पूर्ण केली. ऑटोरिक्षा चालकांचा खरा आधारस्तंभ म्हणजे आ. मुनगंटीवार असल्याची भावना राजेंद्र खांडेकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. कार्यक्रमाचे संचालक मधुकर राऊत यांनी केले व आभार रमेश वजे यांनी व्यक्त केले. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने