लाॅकडाऊन च्या काळातील तीन महिन्याचे वीज बिल माफ करा:- आधार न्युज नेटवर्क जिल्हा चंद्रपूर.

तहसीलदार साहेब तालुका पोंभुर्णा यांच्या मार्फत नितीनजी राऊत उर्जामंत्री म. रा यांना  निवेदन.

राज्य शासनाने एप्रिल, मे, जून 2020 या तीन महिन्याचे वीज बिल माफ करून पोंभुर्णा तालुक्यातील जनतेला द्यावा दिलासा.
Bhairav Diwase.   June 26, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:-  कोरोना मुळे लागू करण्यात आलेल्या संचारबंदीत नागरिकांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. सलग तीन महिने लाॅक डाऊन पाळण्यात आल्याने अनेकांच्या हातचा रोजगार गेला अशात कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचे मोठे आव्हान नागरींका पुढे आहे. यातच भर म्हणून महावितरणाच्या वतीने तीन महिन्याचे विद्युत बिल नागरिकांच्या घरी पाठविले आहे.

आर्थिक संकटात नागरिक असताना वीज वितरण कंपनीने तीन महिन्याचे एकाच वेळी दिलेले बिल नागरिकांना भरणे शक्य नाही असा प्रश्न नागरिंकापुढे पडला असून तो अडचणीत सापडला आहे.
              कोरोना विषाणूचा वाढत्या प्रादुर्भावच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लाॅक डाऊन मुळे उद्योग धंदा बंद झाले आहे. अनेक कामगारावर यामुळे उपासमारीची पाळी आली आहे. अनेक लहान-मोठे व्यवसाय बंद असल्यामुळे व्यापारी आर्थिक अडचणीत सापडले आहे. शेतकरी वर्ग आर्थिक अडचणीत आहे. नवा हंगाम सुरु झाल्यामुळे बी बियाणे खते खरेदीसाठी हाती पैसा नाही सर्व घटक आर्थिक अडचणीत आहे. त्यामुळे राज्य शासनाने एप्रिल, मे, जून 2020 या तीन महिन्याचे वीज बिल माफ करून पोंभुर्णा तालुक्यातील जनतेला दिलासा द्यावा. सध्याची सामान्य नागरिक शेतकरी व लघु व्यवसायिक त्यांची आर्थिक स्थिती ती पाहता लाॅक डाऊन काळातील तीन महिन्याचे वीज बिल माफ करावे.

 लाॅकडाऊन च्या काळातील तीन महिन्याचे वीज बिल माफ करावे. अशी मागणी कु भैरव दिवसे पत्रकार तथा मुख्य संपादक आधार न्यूज नेटवर्क जिल्हा चंद्रपूर आणि कु स्वप्निल मंडोगडे पत्रकार तालुका प्रतिनिधी पोंभूर्णा यांनी दिनांक 26 जुन 2020ला तहसीलदार साहेब तालुका पोंभुर्णा मार्फत उर्जामंत्री म. रा यांना  निवेदन देण्यात आले. 
                   यावेळी पवन फरकडे, गौरव पेंदोर, राकेश कस्तुरे, प्रितम मंडरे, मुन्ना सातरे उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने