आमदार बंटी भांगडीया यांचेकडून नाभीक संघटना भिसी यांना किराणा किटचे वाटप.

नाभीक संघटना भिसी यांचे वतीने आमदार बंटीभाऊ भांगडीया यांचे मानले आभार.
Bhairav Diwase.   June 26, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अरविंद राऊत, चिमूर
चिमूर:- सध्या देशात कोरोनाच्या संकटामुळे सर्वत्र संचारबंदी असून काही दुकाने अटी शर्ती मधे सुरू करण्यात आली आहेत परंतु सलून ची दुकाने उघडण्यास अजूनपर्यंत प्रशाशनाने परवानगी दिली नाही त्यामुळे चिमूर तालुक्यातील सलून व्यवसायिकांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. याची दखल घेत चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री बंटीभाऊ भांगडीया यांनी चिमूर विधानसभा क्षेत्रातील भिसी येथील नाभीक संघटनेच्या ४२ सदस्यांना किराणा किटचे वाटप केले.
           यावेळी  किशोर मुंगले, नितीन गभणे, देवेंद्र मुंगले, राजु गभणे, आकाश ढबाले, राजु बानकर, विनोद खेळकर, लिलाधर बंसोड, बंडू तुम्बेकर, रवी लोहकरे उपस्थित होते. नाभीक संघटना भिसी यांचे वतीने आमदार बंटीभाऊ भांगडीया यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने