Top News

बनावट नावानी फोन करून तलाठ्याला दिली खोटी माहिती.

पोलीस पाटील मेश्राम यांनी मोबाईल नंबर तपासल्यास निघाला गावचाच व्यक्ती.
Bhairav Diwase.   June 21, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अरविंद राऊत, चिमूर
चिमूर:- सध्या देशात कोरोनाच्या महामारीचे संकट सुरू असून प्रत्येक जिल्ह्यातील गावात बाहेरून किंवा जिथे कोरोना होस्पॉट आहे अशा ठिकाणून गावामध्ये येणाऱ्या व्यक्तींकडे जातीने लक्ष दिले जात आहे, गावतील ग्राम व्यवस्थापन समिती या बाबींकडे विशेष लक्ष देत असून अशा व्यक्तींना विलगिकरन कक्षात ठेवण्याचे काम ही समिती निभावत आहे समितीच्या अध्यक्षपदी गावातील सरपंच तर सचिवपदी गावतील पोलिस पाटिल आहे बाकी तलाठी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका हे सदस्य म्हणून कार्यरत आहेत.

   काही गावात गावांची सुरक्षा बाजूला ठेऊन ह्या बाबींवर राजकारण सुरू असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत असाच एक प्रकार  चिमूर तालुक्यातील चिचाळा(शास्त्री) या गावांमध्ये घडला आहे आपल्या गावात नागपूर वरून दहा  ते बारा व्यक्ती आले असून ते खुलेआम फिरत असल्याची माहिती एक व्यक्तीने मोबाईल फोन द्वारे गडपीपरी साजा येथील तलाठी श्री आर.के. पडगेलवार यांना दिली व स्वतःचे नाव सांगतांना सत्यवान रामटेके असे संगीलते तलाठी यांनी पोलीस पाटील श्री मेश्राम यांना तात्काळ संपर्क साधून विचारणा केली तर नागपूर वरून कोणतेच व्यक्ती गावात नसल्याचे सांगितले व जे बाहेर ठिकानुन आले ते व्यवस्थित विलगिकरन असल्याचे संगीलते व सदर नावाची व्यक्ती ही आपल्या गावातच नाही अशी माहिती दिली. तलाठी यांनी त्यांचेकडे मोबाईल वर आलेला नंबर पोलीस पाटील यांच्याकडे दिला असता तो गावातीलच एका व्यक्तीचा निघाला असून पोलीस पाटील मेश्राम यांनी त्या व्यक्तिला बजावले असून पुन्हा प्रशासनास चुकीची माहिती दिल्यास सक्त कारवाई करण्याची ताकीत दिली आहे,हा व्यक्ति गावातीलच असून एका संस्थेत तात्पुरत्या मानधानावर काम करत असल्याची चर्चा नागरिकांत सुरू आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने