पाथरी येथील आरोग्य वर्धिनी केंद्रला लागले रिक्त पदांचे ग्रहण.

Bhairav Diwase
रिक्त पदांचे तात्काळ भरती करण्याची गाववासीय तसेच प्रहार संघटनेने केली मागणी.
Bhairav Diwase.   June 26, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) मिथुन मेश्राम, पाथरी सावली
सावली:- सावली तालुक्यातील पाथरी गाव परिसरातील सर्वात मोठे असून मोठी बाजारपेठ आहे. तसेच इंग्रजकालीन पोलीस स्टेशन तसेच असोला तलाव असून मोठ्या प्रमाणात पावसाळ्यात पर्यटकांची गर्दी देखण्यासारखी असते. तसेच अमदीप इंग्लिश मिडीयम कॉन्व्हेंट, जि. प्राथ. शाळा, जि. प. हायस्कुल, संत तुकाराम कला कनिष्ठ महाविद्यालय , सेतू सुविधा केंद्र, सिंचाई विभागाचे कार्यालय, बँक ऑफ महाराष्ट्र, जिल्हा मध्यवर्ती बँक, जय किसन शेतकरी संस्था, वन विभागाचे क्षेत्र कार्यालय,वन विकास मंडळाचे कार्यालय, पशु वैद्यकीय दवाखाना, टसर रेशीम जिल्हा मुख्य कार्यालय, महसूल विभागाचे मंडळ अधिकारी कार्यालय, तलाठी साजा कार्यालय, भारतीय डाक विभागाचे उपविभागीय कार्यालय,  विद्युत विभागाचे ३३ केव्ही उपकेंद्र, मत्स्य बिज पालन केंद्र, मच्छी पालन सोसायटी, भात गिरण्या,  एवढे मोठे भव्य आणि दिव्य वैभव पाथरीला लाभले आहे.

       त्यामुळे पाथरी परिसरातील 20 ते 25 गावांचा या ना त्या कारणास्तव दररोज संपर्क येत असून पाथरी येथील आरोग्य वर्धिनी केंद्र परिसरातील जनतेला वरदान असून मोठी आस लावून परिसरातील जनता येत असते. येथील केंद्रातील ओ पी डी संख्या ही १५० ते २०० आहे. त्यामुळे या आरोग्य वर्धिनी केंद्रात जिल्हा परिषद मार्फत २१ पदे मंजूर केली आहे. परंतु यापैकी १६ पदे भरली असून उर्वरित ५ पदे रिक्त आहेत. त्यात प्रयोगशाळा तंत्रज्ञ अधिकारी ०१, परिचर ०१, नियमित सफाई कामगार ०१, राज्यस्तरीय नेमणूक अधिकारी ०२, अशी रिक्त पदांची नावे आहेत.


           सध्या देशात कोरोनाच्या संकट असून संपूर्ण देशवासीय भयभीत झाले आहे. आणि त्यातच कोविड -१९  चा मृत्यूचा आकडा पाहता पावसाळा ऋतू ला सुरुवात झाली असून अशात अनेक दुर्धर आजार होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही . त्यातच आरोग्य वर्धिनी केंद्रात अतिशय महत्त्वाची पदे रिक्त असून यात एम बी बी एस डॉक्टर, तसेच प्रयोगशाळा तंत्रज्ञ, तसेच क्षयरोग तपासणी सूक्ष्मदर्शक यंत्र केंद्र कित्येक वर्षे झाले रिक्त असून प्रहार संघटनेने तसेच पाथरी तालूका निर्माण संघर्ष कृती समितीने संयुक्त रीतीने मागणी तसेच निवेदन दिले असून सुद्धा त्यांच्या मागणीला आणि निवेदनाला केराची टोपली दाखवून गाववासीय तसेच परिसरातील जनतेवर अन्याय होत आहे. असे नाराजीचे आणि संतापाचे सूर परिसरात उमटत आहे. 
      
        त्यामुळे पाथरी आरोग्य वर्धिनी केंद्रात त्वरित रिक्त असेली  पदे भरून परिसरातील जनतेच्या समस्येचे निराकरण करावे अशी मागणी गाववासीय तथा परिसरातील जनता, प्रहार संघटना तसेच पाथरी तालुका निर्माण संघर्ष कृती समिती मोठ्या संख्येने करीत आहेत