सभापती म्हणून निवडून आल्याबद्दल आमदार बंटिभाऊ भांगडीया यांनी सर्वांचे मानले आभार.
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य संपादक)भैरव दिवसे, जिल्हा चंद्रपूर
नागभीड:- नागभीड नगरपरिषदेची विषय समिती सभापतीची निवडणुक पार पडली. यात भारतीय जनता पक्षाचे सर्वहि उमेदवार अविरोध निवडुन आले आहेत.
यात नागभीड नगरपरिषदेच्या सार्वजनिक बांधकाम समिती सभापती पदी सचिन आकुलवार, स्वच्छता वैदक व सार्वजनिक आरोग्य समिती सभापती पदी दशरथ उके, महिला व बालकल्यानण समिती सभापती पदी सौ.प्रगती प्रदिप धकाते व उपसभापती पदी सौ.दुर्गा राजेन्द्र चिलबुले यांची अविरोध निवड झाली.
तर पाणि पुरवठा व जलनिस्सारण समिती चे पदसिद्ध सभापती म्हनुन उपाध्यक्ष गणेश तर्वेकर हे असुन समिती नव्याने गठीत करण्यात आली.
या विशेष निवडणूक सभेचे पिठासिन अधिकारी म्हनुन क्रांती डोंबे उपविभागिय अधिकारी, ब्रम्हपुरी निवडणुक कामकाज चालविण्यासाठी मुख्याधिकारी मंगेश खवले, प्रशासकीय अधिकारी लक्ष्मण लोंढे यांनी कामकाज पाहिले.
सभापती म्हणून निवडून आल्याबद्दल आमदार बंटिभाऊ भांगडीया, नगराध्यक्ष डाँ.उमाजी हिरे, भाजपा तालुका अध्यक्ष संतोष रडके ,बाजार समिती सभापती अवेश पठान, उपाध्यक्ष गणेश तर्वेकर, माजी सभापती ईश्वर मेश्राम, नगरसेवक रुपेश गायकवाड, गौतम राऊत, शिरीष वानखेडे, नरेन्द हेमने, सौ.अर्चना मरकाम, सौ.काजल कोसे आदिंनी अभिनंदन केले आहे.