पोंभुर्णा तालुका भाजपाचा उस्फुर्त उपक्रम.
Bhairav Diwase. June 02, 2020
पोंभुर्णा:- कोरोना महामारीच्या काळात अनेक नागरिकांची परिस्थिती आर्थिकदृष्ट्या हतबल झालेली आहे. अनेक नागरिकांना या कोरोना महामारीच्या संकटात मोठा कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.याची जाण ठेवून पोंभुर्णा तालुका भाजपाच्या वतीने ‘सुधीरभाऊ सेवा केंद्र’ भाजप कार्यालयात उघडले असून यातून सर्वसामान्य नागरिकांना मोफत जनधन खाते उघडने, प्रधानमंत्री सुरक्षा विमा काढने आदी कामे केली जाणार असल्याचे पोंभुर्णा भाजपा तालुका अध्यक्ष गजानन गोरंटीवार यांनी सांगितले आहे.