Top News

पोंभुर्णा शहरातील आशावर्कर, अंगनवाडी सेवीका, मदतनीस आणि गाव कोतवाल यानां (कोवीड १९) सेवक म्हणून मानधन देण्याबाबत पोंभुर्णा नगर पंचायतीच्या मुख्याधीकारी यांना निवेदन.

श्री. मोहन चलाख नगरसेवक यांनी नगर पंचायत पोंभुर्णाच्या मुख्याधिकारीला दिले निवेदन. 
Bhairav Diwase.   June 03, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- पोंभुर्णा शहरात कोरोना सदृष्य परिस्थितीत सर्व नागरिक भयभीत होऊन स्वत:ला लाॅकडॉउन करून घरात बसलेले असतांना मागील तीन महिन्यांपासून अंगणवाडी सेविका त्यांच्या मदतीस व गाव कोतवाल हे कार्याकर्ते तुटपुंज्या मानधनावर जिवावर उद्धार होऊन कौंटोबीक तमा न बाळगता तसेच त्यांना कोणतेही सुरक्षा कवच नसतांना उपरोक्त कार्यकर्ते कोरोना (कोवीड-१९) चे आरोग्यदुत म्हणुन स्थानिक पोंभुर्णा शहरात सेवा देऊन नागरिकांना सुरक्षिता प्रधान करीत आहे. त्यांच्या सेवेचा गुणगौरव म्हणुन ग्रामिण विभागात ग्रामपंचायत वरील कार्यकर्त्यांना प्रोत्साहन पर मानधन म्हणून एक हजार रुपये प्रमाणे अदा करण्यात आले. 
      परंतु वरील कार्यकर्त्यांना समान त्याच सेवेकरिता नगरपंचायत स्तरावर कोणतीही उपाय योजना नसल्यामुळे १,०००/- प्रोत्साहन पर मानधनापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे त्यांचे कर्तव्य व स्वाभिमानाला ठेच पोहचत आहे. 
      करीता ज्या अर्थी ग्रामपंचायत स्तरावर वरील प्रमाणे मानधन देऊन कार्यकर्त्यांना गौरवण्यात येत आहे. त्या अर्थी  नगरपंचायत पोंभूर्णा या कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात मागे का? असा प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे. करिता त्यांची सेवा व कर्तव्याची जाणीव म्हणून त्यांना एक हजार रुपये प्रति माह मानधन देऊन त्यांचा गौरव करण्यात यावा. अशी मागणी प्रभाग क्रमांक १० मधील नगरसेवक श्री मोहन चला त्यांनी नगरपंचायत पोंभूर्णा च्या मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने