गोंडपिपरी तालुक्यातील धानापुरात चोर बिटी तस्कर पोलिसांच्या जाळ्यात.

Bhairav Diwase
1 minute read
🔴 400 पॉकिट चोर बीटी जप्त. 
🔴 पोलीस व कृषी विभागाची संयुक्त कारवाई.
     Bhairav Diwase.   June 03, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अमित उइके, गोंडपिपरी
गोंडपिपरी:- महाराष्ट्रात चोर बिटी बियानांवर बंदी आहे. मात्र बंदीतही याची ज्यादा पैशाच्या कमाईमुळे चोर मार्गे या बियानाची सर्रास विक्री सुरू आहे.काल मंगळवार (ता.3) रात्रीच्या ११ च्या सुमारास ४०० पॉकेट जप्तीची कारवाई करण्यात आली. सदर प्रकरणी धानापुरातील गजु ढवस यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

खरीप हंगाम तोंडावर आल्याने शेतकरी बी-बियाणे खते खरेदी करण्यासाठी धावपळ करीत आहे. जमिनीची पूर्वपेरणी व मशागत कामाना वेग आलेला आहे.शेतकऱ्यांनी बी-बियाणे खरेदी करताना अधिकृत परवाणधारक दुकानदारांकडून बियाणे खरेदी करण्याचे आव्हाहन प्रशासनाने केले आहे. तेलंगणा सीमेलगत गोंडपिपरी तालुका असल्याने मोठ्या प्रमाणात तालुक्यात चोर बीटी बियाणांची विक्री होत असते.

छुप्या मार्गाने विक्री करणारे रॅकेट तालुक्यात सक्रिय असल्याची माहिती पोलिसांना व कृषी विभागाला होती. तालुक्यातील एक मोठा शेतकरी व काही राजकीय पक्षाचे नेते मिळून तालुक्यात चोर बीटी विक्रीचा गोरखधंदा सुरु होता.मंगळवारी गुप्त माहितीच्या आधारावर सापळा रचत ठाणेदार संदिप धोबे कृषी अधिकारी मंगेश पवार यांच्या मार्गदर्शनात पोलिस कर्मचारी विजयकुमार कोंमला, रतनसिंग चव्हाण यांनी ४०० बी टी बियाणाचे पॉकिट जप्त केले. पुढील तपास ठाणेदार धोबे व कृषिअधिकारी मंगेश पवार करीत असून. ही चोर बिटी बियाणे नेमके आले कुठून हा प्रश्न तालुक्यातील नागरिकांना पडला असून पोलिसांसमोर ती बीटी आली कुठून हे शोधणे आव्हान असणार आहे.