Top News

सावली तालुक्यातील निमगाव येथे 31 युवकांनी केले रक्तदान.

स्थानिक युवकांचा पुढाकार.
  Bhairav Diwase.   June 04, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- सावली तालुक्यातील निमगाव येथील युवा मित्रपरिवार यांचे विद्यमाने व सामान्य रुग्णालय गडचिरोली,  आरोग्य वर्धिनी उपकेंद्र निमगाव यांचे सहकार्याने रक्तदान शिबीर आरोग्य वर्धिनी उपकेंद्र येथे उत्साहात पार पडला, प्रथमच निमगाव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, देशात नव्हे तर संपूर्ण जगात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव पसरलेला असून राज्यात रक्ताची कमतरता भासत आहे, हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन निमगाव येथील युवकांनी एकत्र येऊन रक्तदान शिबीर घेण्याचे ठरविले व ग्रामीण भागातील युवक सुद्धा रक्तदान करण्यात कमी नाही हे येथील 31 युवकांनी स्वयप्रेरनेने रक्तदान केले व दाखवून दिले, या शिबिराला अविनाश पाल यांनी अकस्मात भेट दिली व येथील युवकांचे अभिनंदन केले, 
    या शिबिराचे आयोजन युवा मित्रपरिवाराचे पुनम झाडे, गौरव यपंलवार, मनोज झाडे, मुकेश थोराक, प्रफुल लाटकर, प्रीतम गोवर्धन, ठामदेव लाटकर, प्रमोद वलादे, प्रकाश पेंदाम, शंकर झाडे, रोशन झाडे, काशिनाथ मोहुर्ले, आशिष जुनघरे, रोशन कन्नाके, सुधीर दिवटे, मोरेश्वर झाडे, ओमकार यपंलवार तसेच शिवराय मित्र मंडळ आणि सामान्य रुग्णालय गडचिरोली चे डॉ. ताराम, सतिश तडकलावार, पंकज निखाडे, सुरज चांदेकर, पेड्डीवार, जीवन गेडाम, हरडे यांनी यशस्वी केले, 
    या शिबिरात आरोग्य वर्धिनी केंद्र अंतरंगावचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरज म्हस्के, निमगाव आरोग्य वर्धिनी उपकेंद्राचे आरोग्य सेविका गुडलावार, उषा खोब्रागडे, आरोग्य सेवक नरेंद्र दडमल, औषधनिर्माता मारोती चव्हाण, आशा स्वयंसेविका उषा चौधरी, यामिना झाडे, भुमिका गेडाम यांचे विशेष सहकार्य लाभले,

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने