सोशल डिस्टंसिन्गचे नियम पाळून पाथरी येथील म. गांधी तंटामुक्त समितीने लावला प्रेमविवाह.

शासनाच्या नियमाच्या अधिपत्याखाली राहून हा प्रेम विवाह पार.
Bhairav Diwase.   June 04, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- आज पाथरी येथील महात्मा गांधी तंटामुक्ती समितिचे अध्यक्ष श्री श्रीधर पाटील ठिकरे, तंटामुक्ती समितीचे सचिव श्री मुकेश मेश्राम, तथा समितीचे सदस्य युधिष्टिर पाटील ठिकरे.व गणेशजी ठिकरे यांनी पुढाकार घेत  कोरोनाच्या संकटकाळात सोशल डिस्टंसिन्ग चे नियम पाळून प्रेम करणाऱ्या दोन जीवांचे मिलन करण्यासाठी विवाह लावून देण्याचे मोलाचे कार्य केले. सदर विवाह लावून देण्याआधी पूर्ण कागदपत्रांची कायदेशीर तपासणी करून पूर्तता केली. व विवाह करणाऱ्या युवक युवतीचे मत जाणून घेतले व विवाह करण्यास कुणाचीही सक्ती नाही  आम्ही आमच्या स्वतःच्या मर्जीने लग्न करण्यास तयार आहोत अश्या आशयाचे शपथपत्र व सत्यापन  त्यांच्या मर्जीनुसार लिहून घेतले व  विवाह पार पाडण्यात आला.सविस्तर वृत्त अशे कि सावली तालुक्यातील करोली येथील श्री गंगाधर निकेसर यांचे चिरंजिव विपुल गंगाधर निकेसर हे मागील 5 वर्षांपासून करोली  येथीलच श्री राजेंद्र मोहुर्ले यांची कन्या मनीषा राजेंद्र मोहुर्ले  हिच्याशी प्रेमसंबंध जुडले हे प्रेमसंबंध लग्न करण्याच्या टोकावर पोहचले आणि आज पाथरी येथील  ग्रामपंचायत कार्यालय येथे तंटामुक्ती समिती ने दोघांच्या सहमतीने व स्वमर्जीने लग्न लावून दिले.  शासनाच्या नियमाच्या अधिपत्याखाली राहून हा प्रेम विवाह पार पाडण्यात आला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने