Top News

अबब ! कुणीच वाली नाही का ..... पाथरीचा?

आरोग्य वर्धिनी केंद्रात एम. बी. बी. एस डॉक्टर च्या मागणीला केराची टोपली.
Bhairav Diwase.   June 04, 2020
   
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- सावली तालुक्यातील पाथरी हे  नगर परिसरातील मुख्य ठिकाण असून तालुक्यातील मोठे गाव आहे. पाथरी ही परिसरातील मोठी बाजारपेठ असून परिसरातील जनता आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी रोज ये - जा करतात. या ठिकाणी इंग्रज कार्यकाळात परिसराच्या घडामोडीवर लक्ष ठेवण्यासाठी मध्यवर्ती ठिकाण म्हणून पोलीस स्टेशन ची निर्मिती केली ते अजूनही या ठिकाणी आहे. शेतकरी राजासाठी सिंचनाची व्यवस्था म्हणून परिसरात दोन पिके घेता येईल एवढ्या क्षमतेचे चंद्रपूर जिल्ह्यातील मोठे जलाशय असलेले असोला मेंढा तलाव आहे. या ठिकाणी इंग्रज कालीन पाटबंधारे विभागाचे कार्यालय होते ते आता मोडकळीस आलेले आहे. या ठिकाणी राष्ट्रीय कृत बँक आहे. या ठिकाणी संत तुकाराम कनिष्ठ महाविद्यालय आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक आहे. जय किसान बँक आहे. वनविभागाचे कार्यालय आहे. एफ . डी सी. एम. चे कार्यालय आहे. इंग्रज यांच्या कार्यकाळात परिसरातील पाथरी हे मध्यवर्ती ठिकाण म्हणून या ठिकाणी त्यांचे कारभार चालवण्यासाठी सर्व सोयी सुविधांची निर्मिती केली परंतु. या परिसरातील राजकीय विरोधापोटी पाथरी हे नगर विकासापासून कोसो दूर जात असून असलेले कार्यालय बंद होण्याच्या मार्गांवर आहेत त्यामुळे पाथरी तथा परिसराचा कुणीच वाली नाही का अशी शन्का निर्माण होत आहे. या ठिकाणी आरोग्याची सुविधा देण्यासाठी जिल्हा परिषद विभागाचे आरोग्य वर्धिनी केंद्र आहे. परिसरातील जनता कामाच्या निमित्ताने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येतात. तसेच आरोग्याच्या दृष्टीने उपचार करण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात येतात या. आरोग्य वर्धिनी केंद्राची ओ. पी. डी. सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे. परंतु या आरोग्य वर्धिनी केंद्रात बी. ए. एम. एस. डॉक्टर ची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आरोग्याच्या दृष्टीने पाथरी तथा परिसरातील जनतेला उत्तम सेवा मिळावी या उद्देशाने वारंवार एम बी. बी. एस. डॉक्टर ची मागणी केल्या जात आहे. परंतु या मागणीला केराची टोपली दाखविल्या जात आहे. म्हणून पाथरी तथा परिसराचा कुणीच वाली नाही का असा प्रश्न जनतेला पडत आहे. ही मागणी जर मान्य झाली नाही तर पुढील निर्णय घेण्यास आम्ही मोकळे राहू असा इशारा या मागणीतून देण्यात येत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने