कसरगाव येथे शेतातील विहिरीत आढळलेल्या मृतदेहाचा चौकशीविनाच अंत्यविधी.

🔴हत्या कि आत्महत्या गूढ कायम.
🔴सौ.लोभीना हिच्या पतीने व सासरकडच्यांनी पोलिस पाटील आणि पोलिस स्टेशनला माहिती न देता तिच्या मृतदेहाला दिला अग्नी.
Bhairav Diwase.   June 05, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- जिबगाव येथील श्री. सुरेश मेश्राम यांची कन्या लोभीना हिचा विवाह दोन वर्षांपूर्वी सावली तालुक्यातील  कसरगाव येथील श्री. महेश भोयर यांच्याशी झाला. लग्न झाल्यानंतर काही दिवसाने सौ. लोभीना भोयर हिला दिवस गेले. आणि सदर महिला ही सहा महिन्याची गर्भवती होती.  मुलीचे आयुष्य सुखी व्हावे व ती सुख समाधानात राहावी असे प्रत्येक पित्याला वाटत असताना दोन दिवसाआधी मधेच घात झाला. कसरगाव येथील बापूजी हुलके यांच्या शेतातील विहिरीत सौ. लोभीना भोयर हिचा मृतदेह आढळून आल्याने वडिलांना धक्काच बसला. सौ. लोभीना हीच्या आदल्या दिवशी घरात काय झाले माहिती नाही. पण घरातून बेपत्ता झाली. तिचा शोधाशोध केला असता ती बापूजी हुलके यांच्या शेतशिवारात असलेल्या विहिरीत मृत अवस्थेत सापडली. सदर महिलेला विहिरीतून बाहेर काढून कुठल्याही विभागाला माहिती न देता त्या मृतदेहाचा पंचनामा केला नाही. आणि मृत देह शविच्छेदनासाठी नेले नाही, मृत देहाला जाळून अंत्यविधी केला. ही बातमी परिसरात सर्वत्र पसरली. 

           या घटनेची माहिती ज्या ठिकाणी पोलीस स्टेशन नाही त्या ठिकाणी एस.डी.ओ यांचेकडून नियुक्ती केलेल्या पोलीस पाटील यांना द्यावयाची होती. पोलीस पाटील यांनी ही माहिती संबंधित पोलीस स्टेशन ला दिली का? जर दिली असेल तर पोलीस विभागामार्फतीने या प्रकरणाची चौकशी का करण्यात आली नाही. जर या प्रकरणाची माहिती कसरगाव येथील पोलीस पाटील यांनी पोलीस प्रशासनाला दिली. नाही तर ही माहिती का देण्यात आली नाही. या घटनेत गावात नियुक्ती करण्यात आलेले पोलीस पाटील तथा या हद्दीतील पाथरी पोलीस विभाग यांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. एकीकडे चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी असताना दारू तस्करी ची माहिती मिळताच त्यांना पकडून त्यांचेवर कार्यवाही करतात. रेती तस्करी करणाऱ्या माफियांची माहिती पोलीस विभागाला मिळते, सुगंधित तंबाखू विक्री करणाऱ्यांची माहिती मिळवून त्यांचेवर कार्यवाही करून उत्तम रित्या कर्तव्य बजावले जात असताना. दोन जीवांची असलेली सौ. लोभीना हिचा संशयास्पद मृतदेह शेतातील विहिरीत आढळला. परिसरात चर्चा झाली आणि ही बातमी कर्तव्यात असलेल्या पोलीस विभागाला किव्हा पोलीस पाटील यांना माहिती झाली नाही. ही घटना पोलीस प्रशासनाच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. या घटनेची चौकशी न करता सौ.लोभीना हिच्या पतीने व सासरकडच्यांनी पोलिस पाटील आणि पोलिस स्टेशनला माहिती न देता तिच्या मृतदेहाला अग्नी दिला. त्यामुळे शंकेला आणखी उधाण आले आहे, कि सौ.लोभीना हिने आत्महत्या केली कि तिची हत्या करण्यात आली. जर आत्महत्या केली तर कारण काय? किंवा हत्या करण्यात आली का? या प्रश्नाचे उत्तर अजूनही सापडले नाही. या संपूर्ण प्रकरणाची माहिती पोलीस विभागाला  नेमून दिलेल्या पोलीस पाटील यांना द्यायची होती त्यांनी का दिली नाही? अशे बरेच प्रश्न शकां कुशंका उपस्थित करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने