बाहेरुन येणा-या नागरिकांचे स्वॅब तपासणी तात्काळ घ्या, आमदार किशोर जोरगेवार यांच्या जिल्हाधिका-यांना सूचना.

बाहेरुन आलेल्या नागरिकांचे स्वॅब तात्काळ घेवून ते लगेच तपासणीकरीता पाठविल्या जावेत अशा सुचना यावेळी आमदार जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी कूणाल खेमणार यांना दिल्या.
Bhairav Diwase.   June 26, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेली संचारबंदी शिथील होताच बाहेर राज्यात व जिल्ह्यात अडकलेले चंद्रपूरातील नागरिक मोठ्या संख्येने स्वगृही परतत आहे. मात्र चंद्रपूरात पोहचल्यानंतर त्याचे स्वॅब घेण्यासाठी तिन ते चार दिवसांचा कालावधी लागत आहे. अशात कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामूळे बाहेरुन आलेला नागरिक चंद्रपूरात पोहचताच त्यांचा स्वॅब घेवून तो तात्काळ तपासणीला पाठविण्यात यावा अशा सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांना दिल्या आहे.


चंद्रपुरात कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार किशोर जोरगेवार यांनी आज जिल्हाधिका-यांची भेट घेवून परिस्थितीचा आढावा घेतला यावेळी यंग चांदा ब्रिगेड चे विश्वजित शाहा, सलीम शेख यांची उपस्थिती होती.

अचानक लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमूळे चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिक बाहेरील राज्यात व जिल्ह्यात अडकलेत. खबरदारी म्हणून जिल्हांच्या सिमा बंद करण्यात आल्या त्यामूळे या नागरिकांना स्वगृही परतण्यास अडचणी येत होत्या हि बाब लक्षात घेता नागरिकांना स्वगृही परतत यावे या करीता प्रशासनाच्या वतीने ई पास ची सोय उपलब्ध करुन दिली. या ई पासच्या आधारे दररोज शेकडो नागरीक स्वगृही परतत आहे. मात्र हे नागरिक चंद्रपूरात परतल्यानंतर त्यांचा स्वॅब तात्काळ घेतल्या जात नसल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वाढली आहे.

 चंद्रपूरात असे अनेक प्रकरणही समोर आली आहेत. गृह विलगीकरनात असलेल्यांचा अहवाल चार ते पाच दिवसांनतर पॉझिटिव्ह आल्याचे प्रकार समोर आले आहे. त्यामूळे चार ते पाच दिवसात गृह विलगीकरणातील नागरिक इतरांच्या संपर्कात आल्यास मोठा धोका निर्माण होऊ शकतो.  याच कारणामूळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच कोरोनाची तपासणी करण्यासाठी चंद्रपूरात सुसज्ज कोरोना लॅबचीही निर्मिती  करण्यात आली आहे. त्यामूळे बाहेरुन आलेल्या नागरिकांचे स्वॅब तात्काळ घेवून ते लगेच तपासणीकरीता पाठविल्या जावेत अशा सुचना यावेळी आमदार जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी कूणाल खेमणार यांना दिल्या आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने