तीन महिन्याचे विद्युत बिल व पुनर्गठन केलेल्या शेतकऱ्याची सरसकट कर्ज माफी करा गोंडपिपरी भाजपाची मागणी.

तहसीदारामार्फत मुख्यमंत्री यांना दिले निवेदन.
 Bhairav Diwase.   June 27, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अमित उइके, गोंडपिपरी                                                  गोंडपिपरी:- देशभरासह राज्यभर कोरोनाने थैमान घातल्याने लाकडाऊन काळात थकित तीन महिन्याचे विद्युत बिल  माफ करण्यात यावे व पुनर्गगठन  केलेल्या शेतकऱ्याांचे कर्ज सरसकट माफ करावे अशा मागणीचे निवेदन गोंडपिपरी भारतीय जनता पार्टीच्या वतीने मुख्यमंत्र्यांना  गोंडपिपरी येथील तहसीलदार मार्फत देण्यात आले.
  याच काळात जून महिन्यात महावितरण कंपनीकडून ग्राहकांना वीज बिलाचे वितरण करण्यात आले. कंपनीकडून मार्च ते जून या तीन महिन्याचे विद्युत बिल सरासरी व जादा दराने देऊन जनतेची आर्थिक गळपेची करण्यात आली. कोरोणाच्या पार्श्वभूमीवर नोकरदार व्यापारी व मजूर वर्गाचा संपूर्णतः रोजगार बंद होता. कंपनीने सदर बिलाचे अंकेशन दर महिन्या चे वेगवेगळे न करता ढोबळ मानाने वाढीव व जादा दर आकारले ते बिल ग्राहकांच्या माथी मारले.
त्यामुळे मार्च ते जून या तीन महिन्याचे विद्युत बिल माफ करण्यात यावे  व गोंडपिपरी तालुक्यातील पुनर्गठन शेतकर्यांचे कर्ज  बँकांच्या चुकीमुळे अजून पर्यत माफ झाले नसून त्या शेतकऱ्याची सरसकट कर्ज माफी करण्यात यावी.  या दोन्ही मागण्या मान्य करण्यात याव्या, मागण्या मान्य न झाल्यास 29 जून पासून उपोषणाचा इशारा  निवेदनातुन गोंडपिपरी तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांना तहसीलदार मार्फत निवेदन सुद्धा देण्यात आले यावेळी  गोंडपिपरी तालुका अध्यक्ष बबन निकोडे, कार्यध्यक्ष साईनाथ मास्टे ज्येष्ठ कार्यकर्ते निलेश संगमवार,माझी नगराध्यक्ष संजय झाडे ,न.प.सभापती राकेश पुण माजी उपसभापती मनीष वासमवार, माजी उपाध्यक्ष चेतन सिंह गौर,न.प.सभापती , गणेश डहाळे यांची उपस्थिती होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने