Click Here...👇👇👇

सात महीन्याच्या मुलीला विहीरीत टाकले व स्वःता ही घेतली विहीरीत उडी.

Bhairav Diwase

सात महीन्याच्या मुलीचा बळी घेणार्या क्रृर पित्यावर गुन्हा दाखल करण्यांची मागणी.
Bhairav Diwase.   June 18, 2020

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अरविंद राऊत, चिमूर
चिमूर:- 
अडेगाव येथे 12 जुन 2020 रोजी, अडेगाव येथील रहवासी संघपाल गजभीये, यांनी पती पत्नी च्या वादावरुन, घरा जवळील अर्धा कि.मी अंतरावरील शेतातील विहीरीवर जाऊन सात महीन्याच्या मुलीला विहीरीत टाकले व स्वःता ही विहीरीत उडी घेतली. विहीरीत उडी घेण्याच्या 20 मिनींट पुर्वी संघपाल गजभीये यांनी पत्नी सरिता गजभीये ला शेजारच्या घरी स्वयंपाक करायला का गेलीस म्हणुन पत्नीच्या छातीवर बसुन गळा दाबुन मारण्याचे प्रयत्न करत असतांना शेजारी डाले/टोपली बनवित असणारे नामदेव गजभीये यांनी सरीता गजभीये यांना संघपाल गजभीये यांच्या तावडीतुन सोडविले. संघपाल हा नेहेमीच असा कृत्य करतो. म्हणुन सरीता गजभीये ही गावातील तंटामुक्ती अध्यक्ष यांचे कडे गेली.

   तेवढ्यात संघपाल गजभीये हा सात महीन्याच्या मुलीला घरुन घेऊन रागात शेताच्या विहीरीकडे जात असतांना गावातील काही महीलांनी बघीतले, अविनाश गजभीये नावाचा मुलगा हा सोनु मेश्राम नावाच्या मुलाला टु व्हीलर वर बसवून घेऊन गेला. पंरतु ते पोहचन्या पुर्वी संघपाल गजभीये हा स्वःताच्या सात महीन्याच्या मुलीला विहीरीत टाकले व स्वःता पण विहीरीत उडी घेतली. मुलीची आई ही घटना स्थळावर पोहचली तेव्हा विहीरीत मुलीची प्रेत पाहुन चक्कर येऊन पडली. त्यानंतर सरीताला दवाखान्यात हलविण्यात आले.

   त्यानंतर सरीता ने पोलीस स्टेशन येथे दिनांक १४/०६/२०२० रोजी जाऊन तक्रार दिली परंतु पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता. म्हणुन सरीता गजभीये ही न्याय मिळावा आणी गुन्हेगाराला शिक्षा व्हावी म्हणुन बहुजन समाज पार्टी च्या जिल्हा अध्यक्ष विक्रांत झामरे यांना निवेदन दिले. निवेदन मिळताच बहुजन समाज पार्टी चे पदाधिकारी जिल्हा महासचिव पेटकर, जिल्हा सदस्य निकोसे विधानसभा अध्यक्ष लभाने, तसेच  आदर्श मीडिया एसोसिएशन ,,महा. अध्यक्ष प्रिया झाबंरे, महाराष्ट्र प्रदेश सचिव युवराज गजभीये हे, सरीता गजभीये सोबत घटना स्थळावर जाऊन सहानिशा केली, गावातील लोकांना विचारपूस केली.

    नंतर पोलिस स्टेशन चिमुर येथे जाऊन ठाणेदार स्वप्निल धुळे यांचेशी चर्चा केली. आणी सात महीन्याच्या मुलीचा बळी घेणार्या क्रृर पित्यावर गुन्हा दाखल करण्यांची मागणी केली आहे. या सर्व घटनेची रुपरेखा /माहीती मृतक मुलिच्या आईने व गावातील लोकांनी घटना स्थळावर, पब्लिक पंचनामा च्या बल्लारपुर प्रतिधीला स्परस्पर दिली आहे.