ग्रामपंचायत सदस्यास मारहाण करून अतिक्रमण धारक फरार.

Bhairav Diwase
सिंदोळा येथील घटना.

 मौकाचौकशी करण्यासाठी गेलेल्या पोलीसांना गावकऱ्यांचा घेराव.

आरोपींना तात्काळ अटक करा, गाव वासीयांची मागणी.
  Bhairav Diwase.   June 30, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- शासनाच्या अनेक जमीनी या पडीत, ओसाड आहेत तर काही जमीनी जनावरांना चरण्यासाठी कुराण म्हणून ठेवण्यात आल्या , सावली तालुक्यातील साजा जिबगाव अंतर्गत येणाऱ्या सिंदोळा या गावातील जमीन ही सुद्धा कुराणासाठी सरकारने दिली होती. पण गावातील काही लोक अतिक्रमण केले त्यांना ग्रामपंचायत सदस्य बंडू उंदीरवाडे यांनी विरोध केला असता , त्यांना मारहाण करून अतिक्रमण धारक फरार झाले आहेत.
    सविस्तर असे की शासनाच्या अनेक जागा तालुक्यात पडीत, ओसाड आहेत. काही जागेवर जनावरांना कुराणासाठी देण्यात आल्या, सावली तालुक्यातील साजा जिबगाव अंतर्गत येणाऱ्या सिंदोळा येथील अशाच कुराणासाठी  रोड टच क्रमांक १०७ कुराण सरकाराची ४ हेक्टर ६५ आर , जागा आहे अमित घोगरे नामक व्यक्तीने अतिक्रमण केले आहे. सोबतच १०८ क्रमांकात ०.४५ आर ऐवढी कुराण जागा आहे यावर अमीत घोगरे, गुरुदास उंदीरवाडे या व्यक्तीचे अतिक्रमण, तसेच रस्त्याच्या दुसरी बाजू २ हेक्टर ४३ आर  आहे. गेली १० ते १५  वर्षांपासून या जागेवर वरील व्यक्तीनी अतिक्रमण करून ठेवले आहे.
     
   सिंदोळा या गावातील ग्रामपंचायत सदस्य बंडु उंदीरवाडे. हे गावातील वनसमीतीचे अध्यक्ष आहेत आणि संपूर्ण गाव या समितीत आहे. गावच्या दृष्टीने व जनावरांच्या दृष्टीने संबंधित जागा ही कुराणच असावी अशी त्यांची आर्त मागणी आहे. परंतु गेली १० ते १५ वर्ष अमीत घोगरे, गुरुदास उंदीरवाडे व्यक्तीनी अतिक्रमण करून ठेवले आहे हा अशाच संघर्ष असताना तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांना अनेक वेळा निवेदव देण्यात आले  शेवटी शासनाने मागील वर्षी त्यांचे अतिक्रमण काढले.
    या वर्षी एक दोन महिन्यांपूर्वी पुन्हा तिथेच आणि त्याच व्यक्तीनी अतिक्रमण केले याची माहिती व तक्रार घेऊन बंडू उंदीरवाडे सावली तहसीलदार यांना दिले , घटनेच्या दिवशी ते तक्रार देऊन येत असताना सिंदोळा नाल्यावर ४.३० च्या दरम्यान अतिक्रमण धारकांनी त्याना बेदम मारहाण केली व फरार झाले.
   सावली पोलिस मौकाचौकशी करण्यासाठी गेले असता गावकऱ्यांनी त्यांना घेराव करुन आरोपींना तात्काळ अटक करा अशी एकमुखी मागणी केली, आरोपी विरुद्ध कलम ३२४,३४ भांदवी मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला, कारवाई पर्यंत आरोपी पोलिसांच्या हाती लागु शकला नाही, घटनेच्या मारहाण प्रकरणी पासुनच तो गायब असल्याचे बोलले जात आहे.एकंदरीत जिबगाव साजा अंतर्गत सिंदोळा  येथे अनेक शेतजमीनी या महसूल विभागाच्या आखात्यारित  येत असून सरकारी आहेत मात्र याचा फायदा घेऊन गावातील  अनेक लोकांनी अतिक्रमण करण्याचा सपाटा सुरू केला मात्र सिंदोळा येथील वनसमितीच्या माध्यमातून सदरचे अतिक्रमण हटविण्यासाठी ग्रा.प सदस्य बंडु उंदीरवाडे च्या माध्यमातून नेहमीच संघर्ष झाला आहे हे मात्र विशेष.