Click Here...👇👇👇

चंद्रपूर जिल्हात एकाच दिवशी १० बाधिताची भर…

Bhairav Diwase
चंद्रपूर जिल्हयातील कोरोना बाधित ७२.
Bhairav Diwase.   June 26, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यामध्ये २५ जून गुरुवारी एकाच दिवशी १० कोरोना बाधिताची भर पडली आहे. गुरुवारी सायंकाळी आलेले दोन व रात्री उशिरा आलेले आठ अशा एकूण दहा बाधितांचा यात समावेश आहे. दहा बाधितामुळे जिल्ह्यातील आतापर्यंतची कोरोना बाधित संख्या ७२ झाली आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार रात्री उशिरा आणखी आठ बाधिताचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.


यामध्ये वरोरा येथील सुभाष नगर वार्ड मधील औरंगाबाद येथून परत आलेल्या एकोणवीस व पंचवीस वर्षीय दोन बहिणींचा समावेश आहे. २४ तारखेला त्यांचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते.२५ जूनला रात्री उशिरा त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.


वरोरा तालुक्यातील वाघनख या गावातील मुंबईवरून परत आलेले व गृह अलगीकरणात असणारे ६४ वर्षीय पती व ५४ वर्षीय पत्नी दोघांचे २४ तारखेला घेतलेले स्वॅब नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. वरोरा शहरातील अभ्यंकर नगर परिसरातील ३२ वर्षीय महिला व ३७ वर्षीय पुरुष हे हैद्राबादवरून २२ तारखेला परतले होते. २२ तारखेपासून गृह अलगीकरणात होते. त्यांचे २४ तारखेला स्वॅब घेण्यात आले होते. ते देखील पॉझिटिव्ह आले आहेत


आरोग्य सेतू ॲप वरील नोंदीच्या माध्यमातून वरोरा तालुक्यातील डोंगरगाव येथील रहिवासी असणारे ६५ वर्षीय व्यक्तीदेखील पॉझिटिव्ह ठरले आहे. त्यांचा स्वॅब नमुना २४ तारखेला घेण्यात आला होता. तर चंद्रपूर शहरातील पठाणपुरा भागातील एका पॉझिटिव्ह बाधिताच्या २७ वर्षीय पत्नीचा अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे.


तत्पूर्वी गुरुवारी सायंकाळी बल्लारपूर येथील कन्नमवार वार्डमधील २८ वर्षीय युवक पॉझिटिव्ह आढळला आहे. हैदराबाद येथून शहरात परतल्याची त्याची नोंद आहे. हा युवक १६ जून पासून संस्थात्मक अलगीकरणात होता.

तर चंद्रपूर शहरातील बाबुपेठ परिसरातील २७ वर्षीय युवतीचा स्वॅब अहवाल गुरुवारी पॉझिटिव्ह आला आहे. यवतमाळ येथून २१ जून रोजी परत आल्यानंतर ही युवती गृह अलगीकरणात होती. काल तिचा स्वॅब नमुना घेण्यात आला. आज अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.


चंद्रपूर जिल्हयातील कोरोना बाधित ७२ झाले आहेत. आतापर्यत ४७ बाधित बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे ७२ पैकी अॅक्टीव्ह बाधितांची संख्या आता २५ झाली आहे. सर्व केरोना बाधिताची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत