जिबगांव ग्रामपचायतचे दुर्लक्ष.
नालीचे व रोडचे बांधकाम उत्कृष्ट दर्जाचे करावे व संबंधित ठेकेदारावर कार्यवाही करण्यात यावी, गावातील नागरिकांनी केली मागणी.
Bhairav Diwase. June 25, 2020
सावली :- सावली तालुक्यातील जिबगांव या गावात खनिज अंतर्गत निधीतुन अंदाजे 14 लाख रुपये खर्चुन नालीचे व रोडचे बांधकाम करण्यात आले आहे. पण हे नाली व रोडचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे केले गेले आहे. या नाली बांधकामात सिमेन्ट,गिट्टी चा व लोहाचं वापर कमी केले असल्याने नालीच्या व रोडच्या बांधकाम केला असल्याने अवघ्या सहा महीण्यातच नालीवर टाकण्यात आलेले पाटल्या जास्त काळ टिकले नसल्याने नाहक त्रास गावकऱ्याना करावा लागत आहे. याविषयी गावकऱ्यानी वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे फोन करून तक्रार दिली होती पण यात कोणत्याही अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही. तर काही अधिकारी येतात खरे पण सदर बाबीकडे दुर्लक्ष करून निघुन जाताना दिसुन यायचे म्हणुन नालीचे व रोडचे बांधकाम निस्कुस्ट दर्जाचे केले असल्याचे गावकर्याचे मणने आहे पण काही खीसेभरू ठेकेदार स्वतःचे खीसे भरण्यासाठी निकृष्ट दर्जाचे काम करीत आहेत.
'या ठेकेदारांना वरिष्ठ अधिकारी यांची भीती नसेल का? किंवा अधिकारी साईडवर येत नाहीत यावर अधिकारी कामचुकारपणा करीत तर नसतील? किंवा हाथ मिळावनी केली नसेल? किंवा ठेकेदाराला राजकीय पुढाऱ्याचे आशिर्वाद असेल काय? असे अनेक प्रश्न जनमानसात होताना दिसत आहेत.,
वरील सर्व प्रश्न खरी असतील तर अशी कामे निकृष्टच दर्जाची होणार,या सर्व बाबी लक्षात घेऊन संबंधित अधिकाऱ्यांनी नाली बांधकामाची पाहणी करून नालीचे व रोडचे बांधकाम उत्कृष्ट दर्जाचे करावे व संबंधित ठेकेदारावर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी गावातील नागरिक करीत आहेत.