कु. स्मिता जगदीश चिकराम. व आर्यन वासुदेव सातपुते हे दोन विद्यार्थी पात्र.
Bhairav Diwase. June 25, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- सावली तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उपरी (केंद्र-सामदा बुज पंचायत समिती सावली) येथील कु. स्मिता जगदीश चिकराम व आर्यन वासुदेव सातपुते हे दोन विद्यार्थी पात्र झालेले आहेत.जवाहर नवोदय विद्यालय पात्रता परीक्षा सन फेब्रुवारी २०२० ला घेण्यात आली होती. त्या परीक्षेत जि. प. उच्च प्राथमिक शाळा उपरी येथील.. कु. स्मिता जगदीश चिकराम. व आर्यन वासुदेव सातपुते हे दोन विद्यार्थी पात्र झालेले आहेत. यानंतरच शिक्षण वर्ग ६ वी हे जवाहर नवोदय विद्यालय तळोधी बाळापुर येथे होणार आहे. त्यांचे शाळेच्या वतीने, पंvस. सावली येथील सर्व पदाधिकारी व अधिकारी यांनी अभिनंदन व कौतुक केले. कु. स्मिता हिचे आई वडिल यांचे दोन वर्षापुर्वीच दु:खद निधन झाले. म्हातारे आजी आजोबा हे त्यांचा सांभाळ करीत आहेत.
अतिशय हलाखीची परिस्थिती असताना सुद्धा स्मिता च्या यशाबद्दल तिचे कौतुक होत आहे.
या तिच्या यशासाठी वर्गशिक्षक मिलिंद खोब्रागडे यांनी वर्षभर विविध माध्यमातून मार्गदर्शन केले. तसेच या दोन्ही विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद याचे मोलाचे सहकार्य लाभले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य व ग्रामस्थ उपरी यांनी यांच्या यशाबद्दल अभिनंदन व शुभेच्छा दिल्या.जि.प.चंद्रपूर चे समाज कल्याण सभापती नागराज गेडाम, पं.स. सावली चे सभापती विजय कोरेवार साहेब, रविंद्र बोलीवार उपसभापती पं. स. सावली,ग्रामपंचायत उपरीचे सरपंच आशीष मनबतुलवार, गणपतजी कोठारे प.स.सदस्य, मान. संतोषभाऊ तंगडपल्लीवार माजी अर्थ व बांधकाम सभापती जि.प. चंद्रपूर, बी डी ओ अमोल भोसले व सर्व शिक्षकवृंद या सर्व मान्यवरांनी शुभेच्छा देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.या यशाबद्दल दोन्ही विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.